धान्य दुकानातुन चोरी करणारे 02 आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखा यांनी केले जेरबंद

धान्य दुकानातुन चोरी करणारे 02 आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखा यांनी केले जेरबंद

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कामठी : पोस्टे अरोली हद्दीतील अपक . १७४/२० कलम ४५७ , ३८० , ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल झाल्यावरून दिनांक १०.११.२०२० रोजी रात्री दरम्यान येथील लक्ष्मी व्यंकटेश्वरा ट्रेडींग कंपनी या नावाची धान्याची दुकानातील कुलूप तोडुन दुकानातील काउटर मधील नगदी व इतर साहित्य एकुण कि . १५,००० / रू . चोरी झाल्याच्या रिपोर्ट वरून नमुद गुन्हा नोंद करण्यात आल्याने दिनांक १ ९ ११.२०२० रोजी गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास करीत असतांना विश्वसनिय बातमिदाराकडुण मिळालेल्या खात्रीशीर बातमी वरून आरोपी १ ) विक्की उर्फ इडो राजु बोरकर , वय २१ वर्ष , रा . कामगार नगर , कामठी , नागपुर व २ ) बादल राष्ट्रपाल मेश्राम , वय २० वर्ष , रा . भोयर कॉलेज समोर , देव नगर कॉलनी , कामठी , नागपुर हे कामठी हद्दीत असल्याने त्यांना ताब्यात घेवून सदर आरोपींना गुन्हयासंबधाने सखोल विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे संगीतले व सदर गुन्हयात त्यांचेव्यतिरीक्त त्यांचा आनखी एक साधीदार फरार असुन त्यांचा शोध घेणे सुरू आहे . त्यांचे ताब्यात सदर गुन्हयातील चोरी गेलेल्या नगदी पैकी नगदी २,००० / – रुपये मिळून आले आहेत . सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री . राकेश ओला , अपर पोलीस अधीक्षक श्री . राहुल माकणिकर , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . अनिल जिट्टावार यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते , पोलीस हवालदार ज्ञानेश्वर राऊत , पोलीस शिपाई रोहन डाखोरे , अमोल वाघ , विपीन गायधने , चालक सहा . फौजदार साहेबराव बहाळे , चालक पोलीस हवालदार भाऊराव खडाते यांनी पार पाडली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात एका रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

Wed Nov 25 , 2020
कन्हान परिसरात एका रूग्णाची भर   #) कन्हान रॅपेट २५ चाचणीतील एक शिक्षक रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८८३.  कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री येथे (दि.२५) ला स्वॅब २४ व रॅपेट २५ च्या चाचणीत नागपुरचा एक शिक्षक पॉझीटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ८८३ रूग्ण […]

You May Like

Archives

Categories

Meta