दुहेरी अपघातात एका पोलीसांचा मुत्यृ तर सात अन्य घायल

दुहेरी अपघातात एका पोलीसांचा मुत्यृ तर सात अन्य घायल

कन्हान,ता.२४ नोव्हेंबर

  आमडी फाटा, पारशिवनी रोडवर सुतगिरणी नयाकुंड जवळ ट्रक व कारच्या अपघात झाल्याने पारशिवनी पोलीस घटस्थळी पोहचुन काही सामाजिक कार्यकर्त्यासह कार मध्ये फसलेल्या चालकास बाहेर काढुन वाहतुक सुरळित करित असताना बेभान वेगाने येणा-या सिप्ट कार ने धडक मारून पोलीस हे कॉ.सह आठ लोकांना घायल केले. यात पोलीस हे कॉ जयंता शेरेकर याचा उपचारा दरम्यान पारशिवनी रूग्णालयात मुत्यु झाला. तर सात जख्मी झाल्याने आरोपी कार चालकास अटक करण्यात आली आहे.


बुधवार (दि.२३) नोंहेबर ला रात्री ८.३० वाजता आमडी फाटा ते पारशिवनी रोड वरील सुतगिरणी नयाकुंड जवळ ट्रक व कारचा अपघात झाल्याने पारशिवनी पोलीस घटनास़्थळी पोहचुन कार मध्ये फसलेला चालक विक्रमसिंह बैस यास काढुन खोंबळलेली वाहतुक सुरळित करित असताना. आमडी फाटा कडुन येणा-या स्विप्ट कार क्र. एमएच ४० केएच ६३९३ च्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणाने व बेभान वेगाने चालवुन तेथील पोलीस हे कॉ सह आठ लोकांना धडक मारल्याने झालेल्या दुहेरी अपघातात हे कॉ.जयंता विष्णुजी शेरेकर वय ४२ राह. येरखेडा, कामठी याचा पारशिवनी रूग्णालयात उपचारा दरम्यान मुत्य झाला. अन्य सात जख्मी झाले. यात चंद्रप्रकाश टेकाड़े (३२) सुतगिरनी नयाकुंड, अमोल कनोजे (३०) पारशिवनी, विक्रमसिंग बैस (४५) नयाकुंड, आकाश कोलांडे (२५) मेहंदी, संदीप तिजारे (३५ ) मेहंदी, गौरव पनवेलकर (३२) पारशिवनी, सागर सायरे (३८) पारशिवनी हे घायल झाले. तीन गंभीर जख्मीचा कामठी व नागपुर येथे उपचार सुरू आहे. पारशिवनी पोलीसांन आरोपी स्विप्ट कार चालक रोशन पाटील (३२) राह. खापरखेडा यास गुरूवार (दि.२४) ला अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्याला नऊ महिने सश्रम कारावास

Thu Nov 24 , 2022
शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्याला नऊ महिने सश्रम कारावास कन्हान,ता.२४ नोव्हेंबर       कन्हान शहरातील पथदिवे लाईट चे काम का नाही केले? असे बोलून‌ 12 वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायधीश डी.बी.कदम यांनी ६ महिने सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मिळालेल्या माहिती नुसार दि. […]

You May Like

Archives

Categories

Meta