सावनेत -खापा वळण मार्गावर अपघाताची शंभर टक्के गॅरंटी संबंधित विभागाचे दुर्लक्ष , नुकताच एका तरूणाचा बळी ; हितज्योती फाऊंडेशन चा पुढाकार

सावनेत -खापा वळण मार्गावर अपघाताची शंभर टक्के गॅरंटी
संबंधित विभागाचे दुर्लक्ष , नुकताच एका तरूणाचा बळी

सावनेर : वळण मार्ग धोक्याचेच असतात . येथे शंभर टक्के अपघाताची गॅरंटी असते . तरीही संबंधित विभाग डोळे लावून बसत असेल तर त्याचा दोष फक्त त्या विभागाकडे जातो . स्थानिक खापा मार्ग रेल्वे क्रॉसिंग नंतरच्या परिसरात सावनेर खापा वळण राज्यमार्गावरील दोन्ही बाजूने वाढलेली काटेरी झुडपांमुळे वाहतूकदारांना समोरून येणारे वाहन दिसून येत नसल्याने असे वळण मार्ग अपघाताला आमंत्रण देत आहेत . नुकत्याच घडलेल्या एका अपघातात सावनेर येथील तरुण युवकाचा बळी गेल्याची घटना घडली . त्यामुळे संबंधित विभागाकडे परिसरातील नागरिक व काही वाहतूकदारांनी वळण मार्गावरील वाढलेल्या या काटेरी झुडपांचेमुळे अपघाताचा धोका असल्याची सूचनाही केली आहे ,

तरी सुद्धा संबंधित विभागाचे या समस्येकडे दुर्लक्ष दिसत कुंभकर्णी झोपेत दिसुन आले . मात्र वाढलेल्या मार्गावरील झुडपामुळे काटेरी अपघात घडू नये , यासाठी सावनेर पोलिसांच्या मदतीने सावनेर वळण परिसरातील अपघातासारख्या घटनेत मदतीला धावून जाण्यात व इतर सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या हितज्योती फाउंडेशनच्या वतीने वाहतुकीला अडचण निर्माण होत असलेल्या काटेरी झुडपांना स्वच्छ करण्याचा उपक्रम हितज्योती फाऊंडेशनचे संयोजक हितेश बनसोड यांनी राबविणे सुरू केले आहे . यासाठी त्यांनी यंत्राचाही वापर केला आहे . त्यांच्या या कार्याला सावनेर पोलिस ठाणेदार मारोती मुळुक व वाहतुक विभागाचे शिपाई यांचे सहकार्य लाभले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आयएमए शाखा सावनेर चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ उमेश जिवतोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण  

Thu Jan 27 , 2022
आयएमए शाखा सावनेर चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ उमेश जिवतोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण   सावनेर :   73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आय एम ए शाखा सावनेर येथे अध्यक्ष डॉ. उमेश जीवतोडे व सचिव डॉ. विलास मानकर यांच्या हस्ते सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विजय घटे, डॉ. रवींद्र नाकाडे, […]

You May Like

Archives

Categories

Meta