पारशिवनी जवळील करंभाड येथील बैलाच्या गोठय़ाला आग लागुन एका बैलाचा यात जळुन मृत्यू

*पारशिवनी जवळील करंभाड येथील बैलाच्या गोठय़ाला आग लागुन एका बैलाचा यात जळुन मृत्यू. एक बैल जखमी झाला. तसेच शेतीपयोगी साहित्य जळाल्याने अंदाजे तीन लाखांच्या वर नुकसान झाले*.

*पाराशिवनी*(ता प्र):-पारशिवनी जवळील करंभाड येथील नवीन वस्तीतील बैलाच्या गोठय़ाला आग लागुन एका बैलाचा यात जळुन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (२४ मे) घडली.करंभाड येथील नवीन वस्तीत राहणारे श्री गजानन बाबुराव गुरवे यांच्या मालकीचा गोठा होता. त्यात दोन बैल, बैलबंडी, तणस व इतर शेतीपयोगी साहित्य ठेवले होते. पण, भर दुपारी गोठय़ाला सोमवारी शानस्कीटू मुळे अचानक आग लागल्याने गोठय़ात बांधलेले दोन बैलां पैकी एक बैल जागीच जळुन खाक झाला. अंदाजे किंमत ४0 हजार रुपये असून, एक बैल जखमी झाला. आगीत बैल तसेच बेलाचे खादय व सिचंन प्लाष्टिक पाईप,पानी मोटार, बंडी चे पाटया, शेतीपयोगी साहित्य जळाल्याने अंदाजे तीन लाखांच्या वर नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच खापानगर परिषद येथील अग्निशमन दला ला प्राचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाचे बंम येईपर्यंत संपूर्ण साहित्य जळुन खाक झाले होते. गावकर्‍यांनी तोपर्यंत आग विझविण्याचा प्रयत्न केला, निर्थक ठरला. पारशिवनी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पारशिवनी ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष वैरागडे,सहायक पोलिस उपनिरिक्षक दिलिप बासोडे , सहकार्‍यांसह घटनास्थळावर दाखल झाले. त्यानी घटना स्थळी एम एस ई बी चे कनिष्ठ अभियंता अक्षय खोपे,तलाठी पुरणकर, मंडळ निरिक्षक राजेश गुढे यांना बोलुन सा क्र २०/२१ ने गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलिस निरिक्षक संतांष वैरागडे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस उप निरिक्षक दिलिप बासोडे सह पारशिवनी पोलिस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हृदय विदारक घटना ; बापाने केली बारा महिन्यांच्या मुलाची हत्या ; सावनेर तालुक्यातील वाकोडी येथिल घटना

Wed May 26 , 2021
हृदय विदारक घटना ; बापाने केली बारा महिन्यांच्या मुलाची हत्या सावनेर तालुक्यातील वाकोडी येथिल घटना सावनेर ता : तालुक्यातील खापा पोलिस स्टेशन हद्दीतील वाकोडी येथे आज सकाळी दहा वाजता चे दरम्यान येथे एका इसमाने आपल्या एक वर्षाच्या मुलाची अमानुषरीत्या दगडावर आपटून हत्या केली . ही ह्रदयविदारक घटना खापा पोलीस स्टेशन […]

You May Like

Archives

Categories

Meta