Skip to content
शिवसेनेच्या ३५ समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश
कन्हान,ता.२५
स्थानिक संस्था निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी गटबाजीपासून दूर रहाण्याचा सल्ला नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत व भाजप कार्यकर्त्यांना दिला होता. भाजपच्या ग्रामीण भागातील नेतृत्वाखाली सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्तीचे काम पूर्ण झाले आहे. ग्रामीण शहरात नियुक्त केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे परिचय संमेलन कांद्री येथील योगी लॉन येथे नुकतेच पार पडले.

भाजपमध्ये प्रवेश घेताना शिवसेनेचे समर्थक
अध्यक्षस्थानी रामटेक भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत होते. जिल्हा महामंत्री अनिल निदान यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी रिंकेश चवरे, उदयसिंग यादव, सुधाकर मेंघर, गजानन आसोले, व्यंकटेश कारेमोरे, डॉ. मनोहर पाठक, हिरालाल गुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. या कार्यक्रमात शिवसेनेचे शिवशंकर वाकुडकर यांच्यासह ३५ समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्यांमध्ये भरत फरकाडे, सचिन कटरे, करण पाली, सोनू ठाकरे, तुलसी पाली, गणेश चोबितकर, तेजस लक्षने, निशांत ठाकरे, विक्की कनपटे, अनुज ठाकरे, नितेश पात्रे आदीचा समावेश होता. प्रास्ताविक कन्हन मंडळाचे अध्यक्ष बिरेंद्र सिंह यांनी केले. त्यात कन्हान विभागांतर्गत ८४ बूथचा समावेश जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषदेसह ग्रामपंचायत स्तरावरील माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मनोज चवरे, डॉ. राजेश ठाकरे, सुरेंद्र बुधे, अतुल हजारे, विनोद किरपान, संजय चोपकर, सुषमा चोपकर, अनिता पाटील, नीळकंठ मस्के, शैलेश शेडके, लखेश्वर वासाडे, मुकेश करसोलिया, सनोज पनिकर, विशाल चापले, मयूर माटे, राजेश पोटभरे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 65