*तालुकातिल अनेक रस्ते अवैध रेती ,मुरूम ,माती वाहतुकीमुळे खराब झाले असून प्रत्येक वेळी कंत्राटदाराला दोष दिल्या जाते*.

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
पारशीवनी (ता प्र):–पारशिवनी तालुका तिल क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर वाळू मुरूम माटी भरुन ग्रामीण भागातील रस्त्यावरून रात्रंदिवस धावत असल्याने गावखेड्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधुन अनेक गावात करोडो रुपये खर्च करुन नवीन रस्ते तयार करण्यात आले. हे रस्ते दोन तीन महिन्यातच रेतीच्या वाहतुकीमुळे पूर्णत: खराब झाले आहेत.
माती,मुरूम,वाळूचे टिप्पर नेण्यासाठी आता ग्रामीण भागातील रस्त्याचा वापर केल्या जात आहे. तसेच ग्रामीण भागातील बांधकाम करणारे लोकं व ठेकेदार हे आता ट्रॅक्टरद्वारे वाळू न घेता टिप्परद्वारे वाळू खरेदी करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावरुन मोठय़ा प्रमाणात अवैध वाळू तस्करी सुरू आहे. पाच वर्षापयर्ंत या रस्त्याची दुरूस्ती कंत्राटदाराकडे असल्याने विनाकारण कंत्राटदाराची बोळवण होत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, नाबार्ड आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात अनेक दळणवळणासाठी रस्ते बनत आहेत आणि बनले आहेत. या रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता अवैध रेती वाहतूक करणार्या वाहनांमुळे पूर्णत: उखडला आहे. तालुकातिल अनेक रस्ते अवैध रेती वाहतुकीमुळे खराब झाले असून प्रत्येक वेळी कंत्राटदाराला दोष दिल्या जाते.
रात्रीच्यावेळी अवैध रेतीची तस्करी करण्याकरिता रेतीमाफिया वेगवेगळी शक्कल लढवित आहेत. या प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी महसूल विभाग कार्यरत आहे, मात्र जाणून डोळेझाक केली जात आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना, पादचार्यांना या रस्त्याने कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे