हृदय विदारक घटना ; बापाने केली बारा महिन्यांच्या मुलाची हत्या ; सावनेर तालुक्यातील वाकोडी येथिल घटना

हृदय विदारक घटना ; बापाने केली बारा महिन्यांच्या मुलाची हत्या
सावनेर तालुक्यातील वाकोडी येथिल घटना

सावनेर ता : तालुक्यातील खापा पोलिस स्टेशन हद्दीतील वाकोडी येथे आज सकाळी दहा वाजता चे दरम्यान येथे एका इसमाने आपल्या एक वर्षाच्या मुलाची अमानुषरीत्या दगडावर आपटून हत्या केली . ही ह्रदयविदारक घटना खापा पोलीस स्टेशन अंतर्गत वाकोडी येथे घडली. वाकोडी येथे आरोपी भजन मेहता कौरती वय 40 यांनी आपल्या लहान मुलाची सत्यम भजन कौरती वय एक वर्ष याची दगडावर आपटून हत्या केली .
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला दारूचे व्यसन असुन त्याने पत्नी मथुरा हीला दारू पिण्याकरता पैसे मागत होता त्यावरून पती – पत्नीचे जोरदार भांडण झाले त्या भांडणांमध्ये मला मुलगी पाहिजे होती पण तुला मुलगा झाला यावरून निर्दयी बापाने चिमुकल्या मुलाला बाहेर काढून दगडावर तीन चार दा आपटल्याने त्या निरागस मुलाचा जागीच मृत्यू झाला फिर्यादी त्याची पत्नी हिच्या बयाना वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई ठाणेदार अजय मानकर करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ग्रा प टेकाडी येथे आरोग्य उपकेंद्राच्या शिबीरात ८२ नागरिकांना लसीकरण

Thu May 27 , 2021
ग्रा प टेकाडी येथे आरोग्य उपकेंद्राच्या शिबीरात ८२ नागरिकांना लसीकरण.  कन्हान : – ग्रा प टेकाडी (को ख) येथे आरोग्य उप केंद्र टेकाडी व्दारे एक दिवसीय लसीकरण शिबीरात ४५ वर्षावरील ८२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.           मंगळवार ( दि.२५) मे ला ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) येथे आरोग्य उपकेंद्र […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta