मायक्रोफायनान्स कर्जे ही कोणत्याही कर्ज माफी योजनेचा भाग नाहीत

मायक्रोफायनान्स कर्जे ही कोणत्याही कर्ज माफी योजनेचा भाग नाहीत


नागपुर : भारतामध्ये, आपण वेळोवेळी विभिन्न राज्यांमध्ये कर्ज माफी योजनांच्या घोषणा केल्या जाताना ऐकतो. या कर्ज माफी योजना फक्त बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जांसाठी लागू आहेत. मायक्रोफायनान्स कर्जे जी साधारणपणे छोट्या व्यवसाय गतिविधींसाठी दिली जातात ती पीक कर्ज म्हणून प्रमाणित नसतात. असे असले तरीही असे अनेक प्रसंग घडताना दिसून येतात जेथे हितसंबंध गुंतलेले काही स्थानिक गट कर्ज माफीविषयी खोट्या अफवा पसरवतात आणि मायक्रोफायनान्सच्या कर्जदारांमध्ये गोंधळ निर्माण करतात.
मायक्रोफायनान्स संस्था या आरबीआय नियंत्रित संस्था असतात
भारतामध्ये, मायक्रोफायनान्स संस्थांचा जन्म गरीब आणि अल्प-उत्पन्न घरांना योग्य वेळेत आणि परवडण्याजोगे क्रेडिट पुरवण्याच्या गरजेतून झाला. मायक्रोफायनान्स कंपन्या काटेकोरपणे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार काम करतात ज्यामुळे कर्ज देणे आणि वसूल करण्याच्या विश्वासार्ह प्रथांद्वारे ग्राहकाच्या हितसंबंधांच्या रक्षणाची खात्री होते. आरबीआयच्या व्यतिरिक्त, ग्राहकाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी, मायक्रोफायनान्स कंपन्यांवर स्व-नियंत्रित मंडळे जसे एमएफआयएन आणि साधन संस्था यांच्याकडूनही नियंत्रण ठेवले जाते. एमएफआयएन अनुसार, मायक्रोफायनान्स कंपन्या सद्य स्थितीत भारतातील 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 610 जिल्ह्यांमध्ये आर्थिक सहाय्य पुरवत आहेत. मायक्रोफायनान्सची ही अतिप्रचंड व्याप्ती भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ बनली आहे.
मायक्रोफायनान्सने ग्रामीण भारतातील लोकांच्या जीवनात कसा बदल आणला आहे त्याची अनेक उदाहरणे आहेत
कोल्हापूर महाराष्ट्र येथील मेघा, मायक्रोफायनान्सची एक कर्जदार आहे. तिने मायक्रोफायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आणि तिचा बांबूच्या वस्तु बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याचा वापर केला. कोणत्याही कटकटीशिवाय क्रेडिट उपलब्ध होण्याची संधी तिला दिली गेली आणि तिने त्या संधीचा फायदा घेतला. वक्तशीरपणे दिलेले परतफेडीचे हप्ते आणि भविष्यात नियमित कर्ज प्राप्त होण्याच्या सुविधेसह, तिचा व्यवसाय आता भरभराटीला आला आहे. तिने तिच्या व्यवसायातून मिळत असलेल्या फायद्याने तिचे घर सुद्धा पुन्हा बांधले आहे. राधिका, कोल्हापूरमधील अजून एक मायक्रोफायनान्स कर्जदार, तिने तिचा व्यवसाय आणि जीवनावश्यक गरजांसाठी मायक्रो कर्ज घेतले. कर्ज नियमितपणे मिळण्याची सुविधा आणि राधिकाने वक्तशीरपणे दिलेले परतफेडीचे हप्ते यामुळे तिच्या तसेच तिच्या कुटुंबाच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव झाला आहे. एका विशिष्ट एमएफआयकडून तिने घेतलेल्या कर्जाच्या मदतीने, ती यशस्वीपणे लाकडापासून बनवलेल्या खेळण्यांचे एक उत्पादन यूनिट आणि स्टोअर चालवते आहे. ती तिच्या मुलांना देखील कोणताही अडथळा न येता नियमित शिक्षण पुरवण्यात सक्षम झाली आहे. असे निरिक्षणात आले आहे कि जर एखाद्या स्त्रीला योग्य संधी मिळाली, तर ती पूर्ण क्षमतेने त्यांचा उपयोग करते.
भारतामध्ये मागील तीन दशकांत, मायक्रोफायनान्स संस्थांनी मेघा आणि राधिका यासारख्या लाखो स्त्रियांना फक्त त्यांच्या व्यवसायाला आर्थिक सहाय्य पुरवून मदत केली इतकेच नव्हे तर त्यांच्या स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी घरकर्जे, शिक्षण कर्जे, स्वच्छता कर्जे, इत्यादी प्रकारांच्या कर्जांसह एक शाश्वत जीवनशैली निर्माण करण्यात देखील मदत केली आहे.
अशाच प्रकारचे एका गरजू व्यक्तीने कर्ज घेण्याचे उदाहरण कुडाळ, महाराष्ट्र येथील संजना आर सी राव यांच्या प्रकरणात दिसून येते. ती आणि तिचे कुटुंबीय अत्यंत खराब आर्थिक स्थितीचा सामना करत होते आणि त्यांना ताबडतोब क्रेडिट मिळण्याची गरज होती. संजनाकडे तिच्या व्यवसायाविषयी एक कल्पना होती ज्यामुळे तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू शकेल परंतु तिच्याकडे तिची कल्पना वास्तवात उतरविण्यासाठी लागणाऱ्या भांडवलाची कमतरता होती. तिला स्थानिक सावकारांकडे जायचे नव्हते कारण त्यांचे व्याजाचे दर खूप जास्त होते आणि परतफेड करण्याच्या अटी सुद्धा जाचक होत्या. तिने तिच्या गावातील एनबीएफसी-एमएफआय कडून रूपये15,000चे कर्ज घेतले. हे कर्ज तिने तिचे इस्त्रीचे दुकान सुरू करण्यासाठी वापरले आणि कंपनीकडून भविष्यात पुढील कर्जे मिळण्यास पात्र राहाण्यासाठी तिने कर्जाची परतफेड सुद्धा वेळेवर केली. सध्या, तिच्यावर कोणतेही कर्ज नाही आणि तिच्या कुटुंबीयांसह ती सुखाने जीवन जगते आहे, आणि तिचा व्यवसाय भरभराटीला आला आहे.
मायक्रोफायनान्स कर्जदारांनी वेळेवर परतफेड करण्याचे महत्व
मायक्रोफायनान्स कर्जदार ज्यांना कर्ज माफ केले जाण्याची अपेक्षा असते आणि जे त्यांच्या कर्जांची परतफेड करत नाहीत, त्यांची क्रेडिट ब्युरो रेकॉर्डमध्ये दोषी म्हणून नोंद केली जाते. एकदा का मायक्रोफायनान्स कर्जदाराची क्रेडिट ब्युरो रेकॉर्डमध्ये दोषी म्हणून नोंद झाली कि, मग तिला भविष्यात मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून वेळेवर आणि परवडण्याजोगे क्रेडिट मिळणे कठीण जाते, आणि त्यामुळे तिला पुन्हा स्थानिक सावकारांकडे जाणे भाग पडते जे अपरिमित व्याज दर आकारतात. त्यामुळे मायक्रोफायनान्स कर्जदारांसाठी काटेकोरपणे क्रेडिट शिस्तीचे अनुपालन करणे महत्वाचे आहे. अशा काही कर्जदारांच्या बाबतीत देखील, ज्यांनी कर्जमाफीच्या अपेक्षेने कर्जाचे काही हप्ते भरलेले नाहीत, ते पुन्हा त्यांचे परतफेडीचे हप्ते सुरू करू शकतात, या उद्देशासह कि ते पूर्ण कर्ज फेडणार आहेत. असे केल्याने क्रेडिट ब्युरो रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद दोषी म्हणून होणार नाही आणि त्यांना भविष्यात मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून परवडण्याजोग्या क्रेडिटची सुविधा मिळणे सुरू राहील. कर्ज माफीविषयी कोणतेही संदेह असल्यास, कर्जदारांना स्पष्टता मिळण्यासाठी त्यांच्या संबंधित मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कर्ज अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करण्याचा सल्ला दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आपले शहर आपली जबाबदारीची भावना ही प्रत्येकाने अवलंबिली तर शहर कचरामुक्त होण्यास मदत होणार : मुख्याधिकारी अर्चना वंजारी

Sat Dec 26 , 2020
*आपले शहर आपली जबाबदारीची भावना ही प्रत्येकाने अवलंबिली तर शहर कचरामुक्त होण्यास मदत होणार* मु.अ.अर्चना वंजारी *सातारा-सांगलीच्या मुलामुलींचे पथनाट्याद्वारे जनजागृती* कमलासिह यादव पारशिवनी तालुका प्रातिनिधी *पारशिवनी*(ता प):- संपूर्ण विदर्भात पहिल्यांदाच नगरपंचायत पारशिवनी येथे स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 व *माझी वसुंधरा अभियाना* *बाबत वासुदेव फेरी*, पथनाट्य इत्यादी अभिनव कार्यक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta