इंडियन मेडिकल असोसिऐशन सावनेर शाखेची 2022-2023 ची नवीन कार्यकारिणी गठीत : डॉ. उमेश जिवतोडे अध्यक्ष

*इंडियन मेडिकल असोसिऐशन सावनेर शाखेची 2022-2023 ची नवीन कार्यकारिणी गठीत*

*डॉ. उमेश जिवतोडे अध्यक्ष , तर
डॉ. आशीष चांडक व डॉ. अंकिता बाहेती उपाध्यक्ष सचिव : डॉ विलास मानकर
सहसचिव : डॉ परेश झोपे.
खजिनदार : डॉ अमित बाहेती.

कार्यकारी सदस्य नवनियुक्तमध्ये
डॉ विजय धोटे,डॉ विजय घटे, डॉ नीलेश कुंभारे, डॉ शिवम पुनियानी,डॉ प्रवीण चौहान तर इतर डाॅक्टरांना सहयोगी पदावर नियुक्त करण्यात आले.

सावनेरः चिकित्सा क्षेत्राच्या उत्थानाकरीता कार्यरत असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सावनेर शाखेची नवीन कार्यकारणीची निवड नुकतीच आयएमए हाँल सावनेर येथे पार पडली त्यात असोसिएशनच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

*इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर च्या वतिने अनेक लोकाभिमुख आयोजने करुण क्षेत्रातील नागरिकांना योग्य आरोग्य व्यवस्था उपलब्ध करुण देण्याकरिता ही संघटना नेहमीच पुढाकाराने कार्य करत असते याचे उदाहरण मावळते अध्यक्ष डॉ.निलेश कुंभारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना काळात केलेले भरीव कार्य आहे. संपूर्ण देशाला सळो की पळो करुण सोडणार्या कोवीड़19 विषाणूंचा प्रादुर्भावात अनेक जनजागृती चे आयोजन करुण आपली सामाजिक बांधिलकी जोपासनारी संस्था म्हणून पुढाकार घेत शासनाच्या कांद्याला कांधा देण्यात पुढाकर घेतला होता हे विशेष.

*इंडियन मेडिकल असोसिएशनची आपल्या सावनेर शहरात शाखा असावी व त्यातून चिकित्सा क्षेत्रात व्यवसाय करणार्या चिकित्सकांना उदभवणार्‍या अडी-अडचणी तसेच आपल्या हातून सामुहीक रित्या समाजकार्य घडावे या हेतुने नगरीतील वरिष्ठ चिकित्सक डॉ. जयंत कुळकर्णी, डॉ. विजय धोटे,डॉ. अशोक घटे,डॉ. विजय घटे, डॉ. रवींद्र नाकाडे,डॉ. विनोद बोकडे आदिंनी 20 वर्षा आधी पुढाकार घेत सावनेर शहरात इंडियन मेडिकल असोसिएशनची शाखा स्थापन करुण मागील 20 वर्षापासून चिकित्सक क्षेत्रात असुनही सामाजिक बांधिलकी जोपासत आहे*

*नुकत्याच पार पडलेल्या सर्वसंमतीने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना संस्थेतील सर्व सदस्यांनी पुढील वाटचाली करिता शुभेच्छां देत मावळत्या पदाधिकाऱ्यांनी पदभार सोपवला*


*याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त नवनियुक्त अध्यक्ष डॉ उमेश जिवतोडे यांनी पुढील नियोजनाबात विचार मांडत म्हटले की आगामी काही दिवसात नविन उपक्रम आयोजीत करित सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने व सहमताने चांगल्या रित्या पार पाडू.

तसेच या प्रसंगी सोबतच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊण स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

एक छोटीसी भेट , हितेश दादा बनसोड के संग

Sun Dec 26 , 2021
#ब्लँकेट वाटप   थंडीचा कहर! सावनेर  :  काल-परवा पेपर मध्ये बातमी वाचली की थंडीमुळे पाच वृद्धांच्या मृत्यू झाला😢 थंडीमुळे दगावल्याची वृत्त ताजे असतानाच ,महाराष्ट्रात हिवाळ्यात पाऊस पडला आणि त्या सोबत थंडीचा कडाका वाढला, या थंडीत गारठून पाच वृद्ध लोकांचा बळी गेला खरंतर ही बातमी मनाला दुःख देणारी होती…… मग आपण विचार […]

You May Like

Archives

Categories

Meta