कन्हान शहर विकास मंच द्वारे बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी

*कन्हान शहर विकास मंच द्वारे बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी*

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे बुद्ध पौर्णिमा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन नाका नंबर सात सुजाता बुद्ध बिहार येथे करुन तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन व बुद्ध वंदना करुन बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली .
बुधवार दिनांक २६ मे २०२१ ला बुद्ध पौर्णिमा निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन नाका नंबर सात सुजाता बुद्ध बिहार येथे करण्यात आले असुन मंच महासचिव संजय रंगारी यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच अध्यक्ष प्रवीण गोडे व मंच सचिव प्रदीप बावने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले असुन कार्यक्रमात बुद्ध वंदना करुन सर्व मंच पदाधिकारी यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली .


या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष ॠषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , प्रकाश कुर्वे , सोनु खोब्रागडे , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बोधी वृक्ष वाटप करून केली बुद्ध जयंती साजरी

Thu May 27 , 2021
बोधी वृक्ष वाटप करून केली बुद्ध जयंती साजरी कन्हान : बुद्ध पौर्णिमा व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमीत्य कन्हान येथील समाज बांधवांनी आंबेडकर चौक येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच बोधी वृक्ष पिंपडाचे झाड वाटप करून बुद्ध पौर्णिमा साजरी केली. प्रसंगी ठाणेदार अरुण त्रिपाठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

You May Like

Archives

Categories

Meta