कामावरून घरी परत येताना विल्यम पॉल यांना आरोपीने मारून जख्मी केले  

कामावरून घरी परत येताना विल्यम पॉल यांना आरोपीने मारून जख्मी केले. 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोली खदान कामावरून विल्यम पॉल हे घरी परत येताना आरोपी राधेश्याम मेश्राम याने रस्त्यात चर्च जवळ अडवुन विनाकारण शिवीगाळ करित मारून जख्मी केले. 

          सोमवार (दि.२६) ला दुपारी १.३० वाजता दरम्यान वेकोली कोळसा खदान कामावरून फिर्यादी विल्यम विनसंट पॉल वय ५९ वर्ष रा टेकाडी वसाहत यांना आरोपी राधेश्याम बंडुजी मेश्राम वय २५ वर्ष रा.  माळीबाबा खदान नं ३ यांने फिर्यादीस रस्त्यात चर्च जवळ अडवुन विनाकारण शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने म्हटले की मला तुझ्याशी काही झगडा करायचा नाही, मी वयाने मोठा आहे आणि मला झगडा करता येत नाही. तेव्हा आरोपी घरी जावुन चाकु सारखे लोखंडी वस्तुने डाव्या हाताचा पंजावर मारून जख्मी करित डाव्या कानाला जखम करून हातभुक्याने नाकावर मारल्याने रक्त निघाले या फिर्यादीच्या तोंडी बयाणावरून कन्हान पोलीसांनी आरोपी विरूध्द अप क्र ३९७ कलम ३२४, ३४१, ५०६ भादंवी नुसार गुन्हा नोंद करून पोहवा अनिल सहारे  पुढील तपास करित आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पोटच्या पोराने आईला चाकु मारून केले जख्मी  

Thu Oct 29 , 2020
मुलाने आईला गळयावर चाकु मारून जख्मी केले.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा (गणेशी) येथे आरोपी मुलाने दारू पिऊन येऊन पत्नीला शिवीगाळ करित असता आई मध्यस्थी करिता आली यावरुन तिलाही शिवीगाळ करून आईच्या गळयावर हंनवटी खाली चाकुने मारून जख्मी करून आरोपी मुलगा पळुन गेला.       सोमवार (दि.२६) ला […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta