उच्चश्रेणीमुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे पदोन्नतीने भरणार : वंजारी यांचे आश्वासन

 

उच्चश्रेणीमुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे पदोन्नतीने भरणार

*प्राथमिक शिक्षणाधिकारी वंजारी यांचे आश्वासन*

*अखिल महाराष्ट्र प्रा.शिक्षक संघाने केली होती मागणी*


    कन्हान :  जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळातील उच्चश्रेणी मुख्याध्यापक,पदवीधर विषय शिक्षक व केंद्रप्रमुखाची रिक्त पदे त्वरीत भरा अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नागपूर चे अध्यक्ष धनराज बोडे याचे नेतृत्वातील प्रतिनिधी मंडळाने शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली.
      जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळातील मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या पदाचा शालेय कामकाजावर परिणाम होत आहे.सध्यास्थितीत जिल्ह्यात केंद्रप्रमुखाची 101पदे,मुख्याध्यापकाची 22पदे,पदवीधर विज्ञान विषय शिक्षक 13 पदे,भाषा विषय शिक्षक 71पदे व समाजशास्त्रज्ञ विषय शिक्षकांची 14 पदे रिक्त आहेत त्यामुळे अशा मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या पदांचा शालेय कामकाज व अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होत आहे.
जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकाचा अतिरिक्त पदभार सहायक शिक्षकांकडे तर कुठे पदवीधर शिक्षकांकडे आहे तर दुसरीकडे उच्चश्रेणी पदाच्या वेतनश्रेणीवर असूनही बहुसंख्य पदावनत मुख्याध्यापक सहायक शिक्षकांचे काम सांभाळत आहे.हिच अडचन केंद्रप्रमुखाचे बाबतीत आहे केंद्रप्रमुखाच्या मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या पदाचा कार्यभार सहायक शिक्षकांकडे असल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या वर्गाच्या अध्ययन अध्यापनावर होत आहे.
त्यामुळे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने नुकतीच प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.वंजारी यांची भेट घेऊन उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर विषय शिक्षक व केंद्रप्रमुखाची रिक्त त्वरीत पदोन्नतीने शिक्षकांमधून भरण्याची मागणी केली.लवकरच ही पदे भरण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. यावेळी सुनिल पेटकर,धनराज बोडे, वीरेंद्र वाघमारे, उज्वल रोकडे,किशोर रोगे,अरवींद लोही,मोरेश्वर पोटे,ओमदेव मेश्राम आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

संविधान निमित्त कार्यक्रमाचे आयोजन : कन्हान

Fri Nov 27 , 2020
संविधान निमित्त कार्यक्रमाचे आयोजन   कन्हान :  चंदन मेश्राम व दिपक तिवाडे मित्र परीवारच्या वतीने 26 नोव्हेंबरला  संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश बर्वे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करून संविधानाचे वाचन करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित सर्व […]

You May Like

Archives

Categories

Meta