श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे रक्तदान शिबिर 

श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे रक्तदान शिबिर 

कन्हान ता.26

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांची विनंती स्वीकारून, दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा येथे आज दिनांक 26डिसेंबर रोजी शनिवारला रक्तदान शिबिर घेण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली .त्या नंतर आपल्या प्रास्ताविक भाषणात आज कोरोना मुळे रक्ताचा तुटवटा खूप आहे  रक्ताची कुठलीही फॅक्टरी आजपर्यंत तयार झालेली नाही त्यामुळे प्रत्येक मानवाला याची गरज आहे व ही एक निष्काम सेवा आहे. आज आपण रक्तदान केलं तर त्यामुळे कुठल्याही दुःखी वेक्तीचा प्राण वाचू शकतो व आपल्या मधीलच कुणाला या रक्ताची गरज भासू शकते आपल्या नातेवाईकांना परिवारातील सदस्यांना तर अशावेळी रक्तांसाठी इतरत्र भटकत राहावे लागते, परंतु आज आपण केलेली निष्काम सेवा ही पूढे आपल्याही कामात येऊ शकते हा विचार करून आपण सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य करून रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा ही विनंती.

महाविद्यालयातील कार्यकारी प्राचार्या डॉ.सुप्रिया पेंढारी यांनी केले त्या नंतर खंडेलवाल ब्लड बँक ची संपूर्ण चमू यांनी शिस्तीने रक्तदान शिबिर पार पाडले. शिबिरात एकूण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रमाला  उपस्थित महाविद्यालयातील प्राचार्या डॉ.सुप्रिया पेंढारी,रासेयो प्रमुख डॉ ऋषिकेश गोरे, प्रा.सारिका सूर्यवंशी, प्रा.पल्लवी ठाकरे , ग्रामीण विकास विद्यालय चे मुख्याध्यापक  राजेश मोटघरे व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

११२ सदस्यांपैकी २१अर्ज सावनेर तहसिलमध्ये दाखल

Tue Dec 29 , 2020
  सावनेर : निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे . या अनुषंगाने सावनेर तालुक्यात एकूण ११२ सदस्यांचे सख्याबळ असलेल्या १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत . यावर ताबा मिळवण्यासाठी स्थानिक गाव पुढाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी कंबर कसली आहे . बारा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ११२ सदस्यांचे भाग्य एकूण ४ ९ […]

You May Like

Archives

Categories

Meta