आमडी येथे महिलांची गहु पिक व्यवस्थापन शेती शाळा संपन्न  

आमडी येथे महिलांची गहु पिक व्यवस्थापन शेती शाळा संपन्न

कन्हान : – पारशिवनी तालुका कृषी कार्यालया व्दारे कन्हान मंडळ अधिकारी श्री जी. बी. वाघ हयांनी आमडी येथे महिला शेतक-यांची गहु पिक व्यवस्थापन शेती शाळेचे आयोजन करून परिसरातील शेतक-यांना गहु पिक व्यवस्थापन व इतर शेती विषयी मार्गदर्शन करण्यात आले. 

          गुरूवार (दि.२१) ला पारशिवनी तालुका कृषी कार्यालय, कन्हान मंडळ अधिकारी व ग्राम पंचायत आमडी यांच्या सयुक्त विद्यमाने आमडी येथे महिला शेतक-या करिता गहु पिकाचे व्यवस्थापन विषयी शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. आमडी सरपंचा सौ शुभांगीताई भोस्कर यांच्या अध्यक्षेत व ग्राम पंचायत सदस्या सौ. शिलाताई सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थित कन्हान मंडळ अधिकारी श्री जी. बी. वाघ हयांनी सदर शेती शाळेत गहु पिक वाढीच्या अवस्था सांगुन त्या नुसार पाणी व्यवस्थापन, कापुस फरदड न घेणे तसेच अवशेष निर्मूलन, हरभरा पिकावरील घाटे अळी एकात्मिक नियंत्रणासाठी पक्षी थांबे, फेरोमन ट्रॅप लावणे, उन्हाळी सोयाबीन लागवड, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, नाडेप, गांडूळ आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

या शेती शाळेचा परिसरातील महिला शेतक-यांनी बहु संख्येने उपस़्थित राहुन लाभ घेतला. शेतकरी मासिकांचे वाटप करून कार्य क्रमाची सांगता करण्यात आली. शेती शाळेच्या यश स्विते करिता कन्हान मंडळ कृषी अधिकारी श्री जी. बी. वाघ सर, कृषी पर्यवेक्षक श्री. एस. पी. कुबडे सर, कृषी सेवक राठोड, ढंगारे व ग्राम पंचायत आमडी च्या कर्मचा-यांनी सहकार्य केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दुचाकी ला ट्रक ची धडक , अपघातातील जख्मी सुबोध बोरकर चा उपचारा दरम्यान मुत्यु  

Thu Jan 28 , 2021
दुचाकी ला ट्रक ची धडक , अपघातातील जख्मी सुबोध बोरकर चा उपचारा दरम्यान मुत्यु कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील वाघोली खाजगी कंम्पनीतुन कामकरून दुचाकी ने घरी परत जाताना तारसा रोड पुलाजवळ अज्ञात ट्रक चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने दुचाकी ला धडल मारल्याने दोन्ही खाली पडुन जख्मी झाल्याने […]

You May Like

Archives

Categories

Meta