धानाच्या गंजीला आग लागुन शेतक-यांचे दिड लाखाचे नुकसान

धानाच्या गंजीला आग लागुन शेतक-यांचे दिड लाखाचे नुकसान

कन्हान : – वाघोली येथील शेतकरी शालीकजी काकडे हयांनी धानपिकाची कापणी करून शेतात ठेवलेल्या चार एकर मधिल धानाच्या गंजीला सकाळी आग लागुन राख झाली. तर लागुनच असलेली पाच एकरांच्या धानाच्या गंजीला गावक-यांच्या मदत कार्या मुळे वाचविण्यात आले. ८० ते ८५ धानबो-यांची गंजी जळुन शेतक-याचे अंदाजे दिड लाखाचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. 

      सोमवार (दि.२५) ला सकाळी ८ वाजता दरम्यान   नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा लगत वाघोली येथे शेतकरी शालीकजी सदाशिव काकडे रा वाघोली हयांचे शेत स न ९८/४ आराजी १. ०९ ( अडीच एकरा +) असुन धान पिकाची कापणी करून ठेवलेल्या धानाच्या गंजी ला आग लागली. गावक-यां ना दिसले असता शालीकजी काकडे हयाना बोलावुन गावक-यांनी ट्रक्टर मध्ये पाणी आणुन मदत कार्य करित पर्यत ही एक गंजी जळुन राख झाली तर लागुन च असलेली धानाची गंजी आगी पासुन वाचविण्यास गावक-यांना यश आले. कोरोना महामारी मुळे बाहेरी ल मजुर वर्ग पाहीजे त्या प्रमाणात येत नसल्याने या वर्षी मजुरांच्या कमतरतेने मजुरांची रोजी जास्त देऊन मजुर मिळत नसल्याने धानाची लावण, कापणी व मळणी ला उशीर होत असुन शेता मध्ये धानाच्या गंज्या लावुन ठेवलेल्या आहे. अश्याच वाघोली येथील शेतकरी शालीकजी काकडे यांच्या शेतातील अडीच एकराच्या धानाची गंजी जळुन राख होऊन अंदाजे दिड लाखाचे नुकसान झाले तर लागुनच असलेल्या गंजी आगीपासुन वाचविण्यास गावक-यांच्या मदत कार्यास यश आले. या कठीण वेळेत शेतक-यांच्या धानाच्या गंजी आगीत राख होऊन नुकसान झाल्याने शासनाने शेतक-यास आर्थिक मदत देण्याची मागणी किसान कॉग्रेस कमेटी नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश काकडे, ग्रा प सदस्य राकेश काकडे, मोरेश्वर काकडे, नारायण जुनघरे, लक्ष्मीकांत काकडे, सुरेश काकडे, जगदीश काकडे, विशाधर गेडाम, रंगराव काकडे सह गावक-यांनी केली आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मा. सुनिल केदारांचे टेकाडी (कोख) सरपंचा सुनिता मेश्राम व्दारे स्वागत करून समस्या सांगितल्या

Thu Jan 28 , 2021
मा. सुनिल केदारांचे टेकाडी (कोख) सरपंचा सुनिता मेश्राम व्दारे स्वागत करून समस्या सांगितल्या कन्हान : – वेकोलि कामठी व गोंडेगाव उपक्षेत्राच्या खुली कोळसा खदान प्रशासना व्दारे निर्माण समस्या जाणुन घेण्याकरिता महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन दुग्ध विकास, युवा क्रिडा मंत्री मा ना सुनिल केदार यांच्या दौ-यात टेकाडी सरपंचा सुनिता मेश्राम यांनी जंगी […]

You May Like

Archives

Categories

Meta