७४ प्रजासत्ताक दिनी मानव अधिकार संरक्षण संघटन केले रक्तदान  भव्य रक्तदान शिबिरात ३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान 

७४ प्रजासत्ताक दिनी मानव अधिकार संरक्षण संघटन केले रक्तदान

भव्य रक्तदान शिबिरात ३४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कन्हान,ता.२७ जानेवारी

    मानव अधिकार संरक्षण संघटन पारशिवनी तालुका अध्यक्ष पंकज रामटेके मित्र परिवार द्वारे ७४ वा प्रजासत्ताक दिना निमित्य तारसा रोड, गहुहिवरा चौक, कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मानव अधिकार संरक्षण संघटन राष्ट्रीय अध्यक्ष मा.अरविंद बांबोर्डे, प्रमुख अतिथि कन्हान-पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर, नप उपाध्यक्ष मा.योगेंद्र रंगारी प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी मा.डॉ शशांक राठोड, यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करित पुजन‌ केले. यावेळी ध्वजारोहण‌ व राष्ट्रगीत गायन करुन रक्तदान शिबीर कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली. आयुष ब्लड सेंटर अॅन्ड कंपोनंट लैब चे विशाल राऊत, रोशनी नागपुरे, कृती पटले, दुर्गेश सपाटे यांच्या सहकार्या ने एकुण ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

    कार्यक्रमात मान्यवरांचा हस्ते रक्तदात्यांना टीफीन बाॅक्स, फळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला. प्रसंगी रवि महाकाळकर, मनीष नंदेश्वर, देवा तडस, अखिलेष मेश्राम, प्रशांत पाटील, सुमेध नितनवरे, राजेंद्र फुलझेले, संजय इंगोले, श्रद्धा चकोले, विजय चकोले, नितेश मेश्राम, प्रमोद चंद्रिकापुरे, रॉबीन निकोसे, अभिजित चांदूरकर, महेश धोंगडे सह आदी ने उपस्थित राहुन सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

विविध सामाजिक, सेवाभावी संस्था व्दारे ध्वजारोहण कार्यक्रम भारतीय स्वातंत्र्यांचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा

Sun Jan 29 , 2023
विविध सामाजिक, सेवाभावी संस्था व्दारे ध्वजारोहण कार्यक्रम भारतीय स्वातंत्र्यांचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा कन्हान,ता.२७ जानेवारी.          भारतीय स्वातंत्र्यांचा ७४ वा प्रजासत्ताक दिन कन्हान परिसरात शासकिय कार्यालय, शाळा, कनिष्ट महाविद्यालय, विविध सामाजिक, सेवाभावी संस्था व्दारे ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहाने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा करण्यात […]

You May Like

Archives

Categories

Meta