सिहोरा येथे बुध्द पोर्णिमेला १११ बुध्द मुर्ती व दोन हज़ार १११ दिप प्रज्वलित करण्यात आले
#) अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्था व्दारे बुद्ध जंयती थाटात साजरी
कन्हान : – अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्था सिहोरा व्दारे बुध्द जयंती निमित्य डॉ.बाबासाहे ब आबेंडकर मेडीटेंशन सेंटर व बुद्धा स्पिरिचुअल पार्क सिहोरा येथे १११ बुद्ध रूप (मुर्ती) व २ हज़ार १११ दिप प्रज्वलित करून मान्यवरांना अष्टधातुच्या १११ बुध्द मुर्ती भेट देऊन बुध्द पोर्णिमा थाटात साजरी करण्यात आली.
भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म, बोधिप्राप्त आणि महापरिनिर्वाण एकाच दिवशी येत असुन संयुक्त राष्ट्र संघ द्वारा वैशाख डे म्हणुन संपूर्ण जगात साजरा कर ण्यात येतो. यावर्षी २०२१ ला भगवान गौतम बुद्ध जयं तीला २५६५ वर्ष पुर्ण होत आहेत. याच दिवसाचे औचित्य साधुन अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्था सिहोरा व्दारे बुधवार (दि.२६) मे ला सायंकाळी सिहोरा (कन्हान) येखील डॉ. बाबासाहेब आबेंडकर मेडीटेंशन सेंटर, बुद्धा स्पिरिचुअल पार्क सिहोरा येथे १११ बुद्ध रूप (मुर्ती) व २ हज़ार १११ दिप प्रज्वलित करून कन्हान नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, कॉग्रेस महासचिव उदयसिंह उर्फ गज्जु यादव, नगरसेवक राजेश यादव, प्रशांत वाघमारे, जेष्ट पत्रकार एन एस मालविये, अजय त्रिवेदी, मोतीराम रहाटे, सुनिल सरोदे, ऋृषभ बावनकर, सुर्यभान फरका डे, विवेक पाटील आदी मान्यवरांच्या उपस़्थित गौतम बुध्द मुर्तीस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, उदयसिंह यादव, मालविय सर, राजेश यादव हयानी भगवान गौतम बुध्दाच्या शांती संदेशा वर प्रकाश देत मार्गदर्शन केले आणि सिहोरा येथील प्रस्थापित डॉ. बाबासाहेब आबेंडकर मेडीटेंशन सेंटर, बुद्धा स्पिरिचु अल पार्क च्या निर्माण कामामुळे सिहोरा (कन्हान) चे नाव अनेक देशात पोहचविण्याचे मौलिक कार्य संस्थेचे नितीन गजभिये करित असल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवर, पत्रकारांना गौतम बुद्ध यांच्या व्हिएतनाम वरून प्राप्त अष्टधातुच्या ९ इंच बुद्ध मुर्ती संस्थेचे अध्यक्ष रमेश गजभिये यांचे हस्ते भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नागरिकांना १११ बुध्द मुर्ती वितरण करून बुध्द पोर्णिमा व जयंती थाटात साजरी करण्यात आली.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन नितिन गजभिये हयांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दिनेश गजभिये, पंजाब गजभिये, जग दीश वारके, अलकेश गजभिये, मनोज मेश्राम, शेखर दहाट, राजेश भेलावे, संजु दहाट, संगीता धारगावे, वंदना गजभिये, आदीने परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.