पावसाळयापुर्वी शहरातील सांडपाणी नाल्याची साफ सफाई करा : ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान

पावसाळयापुर्वी शहरातील सांडपाणी नाल्याची साफ सफाई करा. 

#) ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान व्दारे नगरपरिषद मुख्याधिकारी ना निवेदन. 

कन्हान : – पावसाळयाचे दिवस जवळ येत असुन कन्हान-पिपरी नगरपरिषद अंतर्गत शहरातील नाली व नाल्याची व्यवस्थित साफ सफाई न झाल्याने पावसा ळा लागण्यापुर्वी शहरातील सांडपाणी निकासी नाली व नाल्याची व्यवस्थित साफ सफाई करण्याकरिता न प मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे हयांना ग्रामोन्नती प्रतिष्ठा ण व्दारे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. 

      गुरूवार (दि.२७) मे २०२१ ला ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी चे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतुत्वात नगरपरिषद मुख्याधिका-यांना भेटुन पावसाळयापुर्व व्यवस्थापनावर चर्चा करू न पावसाळयांचे दिवस जवळ येत असुन कन्हान-पिप री शहरातील लोकवस्तीचे सांडपाणी निकासी करण्या -या नाली व नाल्याची आता पर्यंत व्यवस्थित साफ सफाई झाली नसल्याने शहरात कोरोना विषाणु संसर्गा चा प्रादुर्भावाने बिकट परिस्थितीशी लढा देत असताना नगरपरिषद क्षेत्रातील लोकवस्तीचे सांडपाणी वाहणा-या नाली व मोठया नाल्यात गाळ साचुन पावसाळया च्या पाण्याच्या निकासी करिता अडथळा निर्माण होऊ न पावसाचे पाणी लोकवस्ती मध्ये शिरून नुकसान होऊ नये म्हणुन शहरातील मुख्य नाल्याची तातडीने गाळ काढुन स्वच्छता करण्यात यावी. अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आल्याने मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे हयांनी संबधित अधिका-यांना येणा-या ३० तार खे पर्यंत युध्द पातळीवर सांडपाणी निकासी नाली व नाल्याची व्यवस्थित साफ सफाई करण्यांचे आदेश दिले. याप्रसंगी ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरीचे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, अजय ठाकरे, प्रविण गोडे, प्रशांत मसार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

खेडी येथे वर्गणीतुन पांधन रस्त्याचे मातीकाम केले

Fri May 28 , 2021
खेडी येथे वर्गणीतुन पांधन रस्त्याचे मातीकाम केले कन्हान : – गट ग्राम पंचायत खेडी येथील शेतक-यांना वहिवाट करण्याकरिता अडचण होत असल्याने येथील शेतक-यांने वर्गणी करून स्व खर्चाने १ कि.मी पांधन रस्त्याचे मातीकाम करून रस्ता तयार करण्यात आला.         बुधवार (दि.२७) मे ला खेडी येथील शेतक-यांना शेतकाम करण्यास ये-जा करिता […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta