राजश्री शाहु महारज जयंती निमित्य बार्टी समतादुत व्दारे वृक्षरोपन

राजश्री शाहु महारज जयंती निमित्य बार्टी समतादुत व्दारे वृक्षरोपन

कन्हान : – डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादुत प्रकल्पा अंतर्गत पटेल नगर विवेकानंद नगर कन्हान येथे  राजश्री शाहु महारज जयंती निमित्य वृक्षरोपण करण्यात आले.


शनिवार (दि.२६) जुन २०२१ ला आरक्षणाचे जनक राजश्री शाहु महाराज यांच्या जयंती निमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात पर्यावरण दिना निमित्य वृक्षरोपन अभियान राबविण्यात येत असल्याने समतादुत शुभांगी टिंगणे यांच्या प्रकल्पा अंतर्गत पटेल नगर, विवेकानंद नगर कन्हान, शिव मंदीर परिसरात राजश्री शाहु महाराज हयांच्या प्रतिमेला आंगणवाडी क्र ९८ च्या सेविका सुनिता मानकर, शारदा मेश्राम, बार्टी समतादुत शुभांगी टिंगणे   यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन करून वृक्षरोपन करण्यात आले.  वृक्षाचे दैनदिनी जिवनात महत्व असुन वृक्ष आपल्याला सावली देतात, भुजल पातळी वाढवितात, निसर्गाचा समतोल राखण्यास सहकार्य करतात म्हणुनच ” वनश्री हीच धनश्री ” हा मुलमंत्र जपण्यास वृक्षरोपन व संवर्धन हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य असले पाहीजे. असे मौलिक विचार शुभांगी टिंगणे हयानी व्यकत करून समजावुन सांगितले. याप्रसंगी गिता सहारे, अल्का तिवाडे, नागदेवे बाई, लिना नायर, शोभा खरे, मनुबाई येलमुले, कोमल येलमुले, प्रतिक्षा सहारे रूपेश शिंंदे, प्रफुल सहारे, राजकुमार करंडे, मे़श्राम, स्वप्निल मानकर ़आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

माजी गृहमंत्री देशमुखांविरोधात भाजपचे सूडाचे राजकारण

Mon Jun 28 , 2021
*देशमुखांविरोधात भाजपचे सूडाचे राजकारण* मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागील 30 वर्षांच्या कार्यकाळात पारदर्शक कामे केली आहेत. गृहमंत्री पदाच्या जवळपास दीड वर्षांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी करूनही खोट्या प्रकरणात अनिल देशमुख यांना भाजपकडून अडकविण्यात आले. यामागे भाजपचं सूडबुद्धीचं राजकारण आहे. देशमुख यांना गोत्यात आणण्यासाठी भाजपने रचलेला हा आधीच […]

You May Like

Archives

Categories

Meta