धाब्यावर उभ्या १४ चाकी मालवाहक ट्रकचा टायर आरोपीने चोरून नेला

धाब्यावर उभ्या १४ चाकी मालवाहक ट्रकचा टायर आरोपीने चोरून नेला. 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ५ कि.मी अंतराव रील नागपुर जबलपुर महामार्गावरील अण्णामोड डुम री येथील धाब्यावर जेवण करण्यास जाताना १४चाकी ट्रक उभा करून गेले असता अज्ञात आरोपीने उभ्या ट्रकचा टायर चोरून बोलोरो चारचाकी वाहनात टाकुन नागपुर कडे घेवुन पळुन गेल्याने फिर्यांदी ट्रक चालका च्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .

      प्राप्त माहितीनुसार सोमवार (दि.२६) जुलै २०२१ चे ११:३० ते १२:३० वाजता दरम्यान कुमरलाल गौरी प्रसाद यादव वय ४० वर्ष राह. अगरीया थाना मजगमा जिल्हा जबलपुर मध्यप्रदेश चा चालक व त्यांचा क्ली नर हा त्यांच्या ताब्यातील १४ चाकी मालवाहक ट्रक क्र. एम एच ४० एके ४७५७ मध्ये जबलपुर वरून सिंमे ट खाली करून येताना राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील अण्णामोड डुमरी च्या धाब्यावर कुमरलाल गौरीप्रसाद यादव चालक व त्याचा क्लीनअर हे जेवन करण्याकरि ता गेले असता ते जेवन करून परत आले तेव्हा १४ चाकी ट्रकच्या डाव्या बाजुचा लिफटर टायर अपोलो १०० केएल किमत ८००० रुपयाचा टायर ट्रकला लागु न दिसला नाही तेव्हा चालक व क्लीनरने ट्रकच्या मागे उभ्या पांढऱ्या रंगाची बोलोरो चारचाकी वाहन क्र एम पी- १९ -सीसी – ४९१७ ही उभी दिसली व त्यात गाडी च्या मागच्या भागात ट्रक च्या टायर दिसला. चालक व क्लीनर गाडी जवळ येतांना पाहुन बोलोरो चारचाकी वाहनाचा चालक आरोपीने त्याचे ताब्यातील वाहन ना गपुर कडे घेवुन पळुन गेला. फिर्यादी कुमरलाल यादव  ने त्याचा पाठलाग केला पण आरोपी मिळुन आला नसल्याने सदर प्रकरणी फिर्यादी चालक यांचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी विरुद्ध कल म ३७९ भांदवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन सदर आरोपीचा शोध घेणे सुरु असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष क अरूण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार जयलाल सहारे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गुरुपौर्णिमा निमित्त गुरुपूजन कार्यक्रम संपन्न

Thu Jul 29 , 2021
गुरुपौर्णिमा निमित्त गुरुपूजन कार्यक्रम संपन्न कामठी : महाराष्ट्र शाहीर परिषद,शाखा कामठी आणि भारतीय क शाहीर ड मंडळ,कामठी यांच्या वतीने लोकशाहीर वस्ताद स्व भीमराव बावनकुळे गुरुजी,हनुमान नगर,येथे पोवाडे, डहाका, भजन कार्यक्रम करून गुरुपूजन कार्यक्रम साजरे करण्यात आले. यावेळी शाहीर विक्रम वांढरे भगवान लांजेवार,नरेंद्र महल्ले,दशरथ भडंग,राजेंद्र लक्षणे,मोरेश्वर बडवाईक,महादेव पारसे,भुपेश बावनकुळे,गिरीधर बावणे,धर्मदास देवगडे, […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta