११४ आदीवासी गोवारी शहीदांना कन्हान ला श्रध्दाजंली अर्पण.
कन्हान : – आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र
शाखा कन्हान च्या वतीने २३ नोव्हेंबर आदीवासी गो वारी शहीद दिनानिमित्य आदीवासी गोवारी शहीद चौ क तारसा रोड कन्हान येथे ११४ आदीवासी गोवारी श हीदांना सामुहिक श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. आदिवासी गोवारी शहीद चौक तारसा रोड कन्हान येथे आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र शाखा कन्हान व्दारे २३ नोव्हेंबर आदीवासी गोवारी शहीद दिनानिमित्य श्रध्दाजंली कार्यक्रम कन्हान नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अति थी आदिवासी गोवारी समाज संघटन पारशिवनी तालुका अध्यक्ष नेवालालजी सहारे, विरोधी पक्ष गट नेते राजेंद्र शेंदरे यांच्या हस्ते आदीवासी शहीद कन्हान कांद्रीचे ताराचंदजी भोंडे, कामठीच्या करूणाताई नेवारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व शहीद स्मारका वर पुष्प अर्पण करून दोन मिनिटाचे मौनधारण करून ११४ आदिवासी गोवारी शहीदांना भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक आंनद सहारे यांनी केले. याप्रसंगी गोवारी समाजाचे प्रमुख वक्ता भगवानजी भोंडे यांनी गोवारी समाजावर जो अन्याय, अत्याचार होत आहे, तो थांबविण्यास आता स्वतःचे नेतृत्व स्वतः करित सामाजिक एकतेने संघर्ष करायला पाहिजे. असे आवाहन केले. कार्यक्रमास कन्हान न प उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, नगरसेवक अनिलजी ठाकरे, नगरसेविका अनिता पाटील, रेखा टोहणे, गुंफाताई तिडके, मोनिका पौनीकर, रामभाऊ दिवटे, माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे, माजी उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक, महेंद्र भुरे, अतुल हजारे, भगवान सरोदे, संगीता वांढरे, सविताताई सहारे, सुगंधाबाई भोंडे, सरिता लसुंते, उषाताई सोनवाने, शेन्द्रे ताई, सितारामजी राऊत, दिलीप राऊत, विलास लसुंते, शामलाल नेवारे, शैलेश शेळके, रामदास वाघाडे, नरेश कोहळे सह बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.