अपघातात पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू

अपघातात मृत्यू २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू  

उमरेड : – अंतर्गत 02 कि.मी. अंतरावरील मौजा गिरड रोड सोयाबिन कंपनी जवळ धुरखेडा येथे दिनांक 25 / 12 / 2021 चे 19:30 वा . ते 20.00 वा . दरम्यान एम . एच . 40 / बीजी 4761 क्रमांकाच्या ट्रकचा चालक आरोपी नामे- राजकुमार उमाशंकर यादव , वय 42 वर्ष , रा . ध्रा पो.स्टे . कुभेला जि . बलीया उत्तर प्रदेश याने आपल्या ताब्यातील ट्रक हा भरधाव वेगाने व निष्काळजीपणे धोकादायकरित्या चालवुन अचानकपणे निर्भय काटयाकडे डाविकडे कोणत्याच प्रकारचे सिग्नल न देता ( इंडिकेटर ) न देता वळल्याने पाठीमागुन येणाऱ्या एमएच- 40 / 8725 क्रमांकाच्या होन्डा शाईन मोटरसायकला धडक दिली .

 या अपघातात मोटरसायकल चालक आकाश अशोक गिरडकर ( मृतक ) वय 25 वर्ष रा . मंगळवारीपेठ , उमरेड हा जखमी होवुन मोटरसायकलसह रोडवर पडला . तरीदेखील आरोपी ट्रक चालकाने कोणत्याच प्रकारची वैदयकीय मदत न करता घटनास्थळावरून पळुन जावुन त्याचे मरणास कारणीभुत ठरला . सदर प्रकरणी सरतर्फे पोउपनि राजु वासुदेव डोर्लीकर पोस्टे उमरेड यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे . उमरेड येथे आरोपी चालकाविरुध्द कलम 279 , 337 , 304 ( अ ) भादंवी . सहकलम 184 , 134 अ ब मोवाका कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनि  पाटील व टिम  करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

श्री संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे क्रांन्दी- कन्हान शहरात भव्य स्वागत 

Wed Dec 29 , 2021
*श्री संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे क्रांन्दी- कन्हान शहरात भव्य स्वागत  * श्री संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेने कन्हान मायानगरी दुमदुमली… * संत संताजी जगनाडे महाराज यांचे रथ यात्रेचे स्वागत जल्लोषात…. *महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या द्वारे भव्य आयोजन कन्हान – श्री संत जगनाडे महाराज यांचे जन्मस्थल चाकण व समाधि स्थल […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta