ऑटोरिक्षाच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी 

 

ऑटोरिक्षाच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी

कन्हान,ता.२८ डिसेंबर

       कांद्री- कन्हान नॅशनल महामार्ग क्रं ४४ वरील सर्विस रोड वर पोटभरे यांचा शेता जवळ ऑटोरिक्षा चालकाने दुचाकी वाहनाला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जख्मी झाल्याने रोहित यांच्या तक्रारी वरून ऑटोरिक्षा चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला.

    प्राप्त माहिती नुसार, रविवार (दि.२५)डिसेंबर रोजी रोहित शंभु परिहार घरी हजर होता. रोहित यांचे वडिल शंभु परिहार (वय -६५) हे घरची होंडा एक्टीवा क्रं.एम एच ४०वी.आर ०५११ ने दुपारी १:४५ वा. च्या दरम्यान घरुन निघुन जैन हाॅस्पीटल कांद्री येथे गेले होते.‌ रोहित घरी हजर असतांना दुपारी २:०५ वा. च्या दरम्यान अक्षय मोटघरे याने रोहित ला फोन द्वारे माहिती दिली कि “तुम्हारे पिताजी ना ऑटोरिक्षा क्रं.एम एच ४० ए.आर ८६३० ‌‌चालकाने मागुन धडक दिल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन गेल्याचे सांगितले ” अशी माहिती दिल्याने, रोहित याने मित्रांचा सहायाने कामठी रुग्णालयात दाखल केले. पोलीसांनी रोहित परिहार यांचा तक्रारी वरून ऑटो रिक्षा चालका विरुद्ध कलम २७९ , ३३७ , ३३८ भांदवि सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यभान जळते करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सोळा निर्दोष लोकांना चोरीचा संशय घेऊन मारहाण गहुहीवरा गावकऱ्यांना महिलां, पुरुषांनी मागीतली जिवेची भिक

Thu Dec 29 , 2022
सोळा निर्दोष लोकांना चोरीचा संशय घेऊन मारहाण गहुहीवरा गावकऱ्यांना महिलां, पुरुषांनी मागीतली जिवेची भिक  कन्हान,ता.२९ डिसेंबर       कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील गहुहिवरा शिवार येथे गावकऱ्यांनी चोरीच्या संशया वरुन‌‌ सोळा लोकांना लाठी- काठीने, हातबुक्याने मारहण करुन गंभीर जख्मी केल्याने पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून १० ते १५ आरोपी विरुद्ध […]

You May Like

Archives

Categories

Meta