ग्रामीण भागातील शिवसैनिकांत नाराजीचे सूर  ; जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची एक सुराने मागणी  

ग्रामिण भागातील शिवसैनिकांत नाराजीचे सूर  

जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची एक सुराने मागणी  

 

सावनेर  : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याने शिवसेनेचे प्रस्थ हळूहळू कमी होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना येथील पत्रकार परिषदेतून केला . विश्रामगृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय पत्रकार परिषदेत वरिष्ठ शिवसेना नेते विनोद जिवतोडे , उत्तम कापसे , किशोर राय ( नरखेड ) , रितेश हेलोंडे ( काटोल ) , संतोष केचे ( हिंगणा ) आदींसह जिल्ह्यातील इतर तालुक्यातील वरिष्ठ शिवसैनिकांच्या उपस्थितीत नाराजी व्यक्त केली . जिल्हाप्रमुख राजू हरणे व त्यांचे सहकारी , पदाधिकारी यांच्यावर त्यांच्या निष्क्रीयतेमुळे जिल्ह्यात शिवसेना रसातळाला जात असून सामान्य शिवसैनिक तर सोडाच , जिल्ह्यातील विधानसभा , तालुकाप्रमुख , शहरप्रमुख आदींनासुध्दा डावलले जात आहे . जुन्या वरिष्ठ व अनुभवी पदाधिकाऱ्यांना हेतूपुरस्पर डावलून त्यांना अपमानास्पद वागणूक देणे , मनमर्जीच्या लोकांना संघटनेत स्थान देऊन जिल्हा शिवसेनेला ‘ लिमिटेड कंपनी ‘ बनविण्याचे कटकारस्थान जिल्हाप्रमुख करीत असा आरोप करून त्यामुळे पक्षनिष्ठ शिवसैनिकांनी मागील नऊ वर्षापासून कार्यरत जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी एका सुरात करण्यात आली . पक्षश्रेष्ठींनी या विषयावर विशेष लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावा , अशी विनंती शिवसेनेचे उत्तम कापसे यांनी केली आहे .


याप्रसंगी नरखेडचे माजी तालुकाप्रमुख संदीप बरडे , माजी सरपंच नामदेव मोरे , खापा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक भूपेन्द्र कोसे , विजय पोटोडे , तिलक क्षिरसागर , संजय गिरमेकर , रवींद्र काटकर , दिवाकर कडू , लाला यादव , जितू बिंदानी , छोट्र सिंग , मिलिंद कुर्वे , रोशनी चौधरी , विशाखा शेलारे , राधेश्याम गावंडे , शिवदीन देशमुख , प्रशांत कामोने , आशीष धोटे , युवराज कुंभारे , आशीष धांडोळे , सुहास लाड , स्वप्नील लाडेकरसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोळसा खदानचे दुषित पाणी कन्हान नदी पात्रात सोडणे त्वरित थांबवा - माजी खासदार प्रकाश जाधव

Fri Jan 29 , 2021
कोळसा खदानचे दुषित पाणी कन्हान नदी पात्रात सोडणे त्वरित थांबवा – माजी खासदार प्रकाश जाधव # ) कामठी व इंदर खुली खदान व्दारे दोन एसटीपी लावुन पाणी स्वच्छ करूनच सोडुन कन्हान नदी पात्र प्रदुर्षण मुक्त करा.  कन्हान : – वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी व इंदर खुली कोळसा खदान मध्ये […]

You May Like

Archives

Categories

Meta