महिला बचत गटाचा हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न

महिला बचत गटाचा हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न

#) महिला बचत गटा व्दारे श्रीराम मंदिर निर्माण करिता पाच हजार रूपये दान.

कन्हान : – भुमिपुत्र महिला स्वयं सहायता गटा व्दारे श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभिया नांतर्गत कांद्री येथे महिलांचा भव्य हळदी-कुंकू कार्यक्र म घेऊन मंदीर निर्माण करिता पाच हजार रूपयांचे दान करण्यात आले.
कान्द्री परिसरातील हनुमान मंदिर,वॉर्ड क्रं.५ येथे भुमिपुत्र महिला स्वयं सहायता महिला गटा च्या वतीने श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभिया नांतर्गत भव्य हळदी-कुंकु कार्यक्रम दुर्गा वहिनीच्या संयोजिका सौ.सरीकाताई येवले यांच्या अध्यक्षेत व चेतना ऍग्रो प्रोडक्ट च्या संचालिका सौ.चेतनाताई खळ तकर, समाजसेविका सुनंदाताई दिवटे, नगरसेविका सुषमा चोपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलि त करून सुरूवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत सत्कारानंतर अथितींनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपीय भाषण व महिला बचत गटाच्या व्दारे श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण अभियाना करि ता बचत गटाच्या अध्यक्षा सौ.अरुणाताई हजारे यांनी महिला बचत गटा व्दारे दान म्हणुन पाच हजार रूपया चा धनादेश मान्यवरांकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.पौर्णिमा ठाकरे यानी तर सुत्रसंचालन सौ.प्रियांका मदनकर यांनी केले. हळदी कुंकू कार्यक्र मास मोठ्या संख्येत बचत गटांच्या महिला भगिनी उपस्थितीत होत्या. यशस्विते करिता राखी गभणे,मीरा कुंभलकर, वंदना गडे, प्रिती लांडगे, प्रज्ञा लोणारे, चिंधा बाई भुरे, सुनीता भिवनकर, दुर्गा भुते, अरूणा पोहर कर, विभा पोटभरे, शालिनी बर्वे, पल्लवी शर्मा, राणी लोणारे, रिता मस्के, लीना बनाईत, सुनीता सावरकर, सीताबाई राऊत आदीने सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

विद्यार्थी आत्महत्या थांबविण्यासाठी परिक्षेपूर्व समुपदेशन करा

Sun Jan 31 , 2021
विद्यार्थी आत्महत्या थांबविण्यासाठी परिक्षेपूर्व समुपदेशन करा #) माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री मिलिंद वानखेडे यांची मागणी.  कन्हान : – कोविड १९ च्या गडद छायेत १० व १२ वी च्या परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. अपूर्ण अभ्यासक्रम व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. निकालानंतर होणाऱ्या विद्यार्थी आत्महत्या थांबविण्यासाठी परिक्षेपूर्व समुपदेशन […]

You May Like

Archives

Categories

Meta