कन्हान शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता ठिय्या आंदोलन  नारी शक्ती संघर्ष समितीचा पुढाकार

कन्हान शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता ठिय्या आंदोलन

नारी शक्ती संघर्ष समितीचा पुढाकार

कन्हान, ता.२९ फेब्रुवारी 

    मुली व महिलांची सुरक्षा, समाजकंटाका वर नियंत्रण आणि अवैद्य धंद्यावर आळा घालण्या करिता नारी शक्ती संघर्ष समिती व्दारे कन्हान, कांद्री शहरातील चौका-चौकात आणि टेकाडी बस स्थानक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्या करिता तारसा रोड चौकात एक दिवसीय ठिय्या आंदोलन करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी करण्यात आली.

    कन्हान शहर व परिसरातील मुली व महिलांची सुरक्षा, समाजकंटाकावर नियंत्रण आणि अवैद्य धंद्यावर आळा घालण्याकरिता नारी सक्ती संघर्ष समिती कन्हान – कांद्री अध्यक्षा संगिता वांढरे यांच्या नेतुत्वात महिलांनी सोमवार (दि.२६) फेब्रुवारी ला सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत तारसा मार्ग चौक कन्हान येथे मंडप, बँनर लावुन एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले.

   ठिय्या आंदोलनात कन्हान, कांद्री व जे.एन.दवाखाना रोड, टेकाडी बस स्थानक चौक मुख्य ठिकाणी स्थानिक प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी महिलांनी केली आहे. संगिता वांढरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील समाज कंटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्या बाबत आम्ही सर्व संबधित अधिकाऱ्यांना तीन महिन्यां पूर्वी निवेदन दिले होते. शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांनी सुद्धा निवेदने दिली होती. परंतु तीन महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी लोटुनही या गंभीर समस्ये कडे कोणीही लक्ष दिले नसल्याने आम्ही एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले आहे. यावरही शासन, प्रशानाने गंभीर दखल घेऊन चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावली नाही. तर यापुढे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनास रमेश भाऊ कारेमोरे, नरेश भाऊ बर्वे, रीताताई बर्वे, रूपाताई उईके, मोहनी काटेवार, ज्योती येळणे, मिना गि-हे, सविता डांगरे, अंजु पोटभरे, यशवंत आंबिलढुके, पंकज कुंभलकर, मंगेश भोंदे आदीने सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रस्त्यावरील कुत्रे निर्दयपणे मारून, क्रुतेने वाहनात भरून नेणा-या विरूध्द गुन्हा दाखल घटनेचा विडिओ वायरल झाल्याने आर.ए.डी संस्थे व्दारे दखल 

Thu Feb 29 , 2024
रस्त्यावरील कुत्रे निर्दयपणे मारून, क्रुतेने वाहनात भरून नेणा-या विरूध्द गुन्हा दाखल घटनेचा विडिओ वायरल झाल्याने आर.ए.डी संस्थे व्दारे दखल  कन्हान, ता. २९ फेब्रुवारी     नगरपरिषद अंतर्गत रस्त्यावरील कुत्र्यांना निर्दयपणे मारून रक्त बंबाळ अवस्थेत कुरतेने चारही पाय व तोंड बांधुन वाहनात टाकुन नेणा-याचा विडिओ वायरल झाल्याने आरएडी बहुउद्देशिय संस्थेच्या तक्रारी वरून […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta