कन्हान नदी रक्षाघाटावरील लोकांच्या गर्दीला प्रतिबंधात्मक निर्बंध  कोण लावणार ? 

कन्हान नदी रक्षाघाटावरील लोकांच्या गर्दीला प्रतिबंधात्मक निर्बंध  कोण लावणार ? 

कन्हान : – परिसरात दिवसेदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढुन मुत्यु संख्येत वाढ होत असुन कन्हान नदीच्या रक्षाघाटावर नागपुर शहर व बाहेर गावातील लोकांच्या भयंकर गर्दी नदीत राख विसर्जन करताना होत आहे. तसेच त्यांना लागणा-या चाय, नास्ता,पिण्याचे पाणी व ईतर साहित्य रक्षाघाटा जवळील दुकान व शहारात फिरून खरेदी करते वेळी कन्हान शहरातील नागरिकांशी त्यांचा संपर्क होत असल्याने कोरोना संमक्रमणास निमंत्रण देत असल्याने कन्हान नदीच्या रक्षाघाटावरील लोकांच्या गर्दीला कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध कोण लावणार ? 
           कन्हान शहरात दिवसेदिवस कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढुन रूग्णाच्या मुत्युचे प्रमाण सुध्दा वाढत असताना येथील शासन प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हयात सर्वीकडील रक्षा घाटावर निर्बंध असल्याने कन्हान नदीच्या रक्षा घाटा वर नागपुर शहर व बाहेर गावातील लोक मोठया प्रमाणात बिनधास्त येऊन कन्हान नदीत कोरोना बाधित किंवा अन्य मुत्युदेहाची राख विसर्जन करताना भयंकर गर्दी करित आहे. त्यांना लागणा-या चाय,नास्ता,पिण्याचे पाणी व ईतर साहित्य रक्षाघाटा जवळी दुकान व शहारात फिरून खरेदी करते वेळी कन्हान शहरातील नागरिकांशी त्यांचा संपर्क होत असल्याने कोरोना संमक्रमण वाढण्यास मदत होत आहे. येथे येणा-या दुचाकी, चारचारी व ईतर वाहनधारका कडुन अवैध पॉर्किंग वसुली करणे हे शुध्दा एक आश्चर्य आहे. नगर परिषरिषद, पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन एकमेका कडे बोट दाखवित दुर्लक्ष करित आहे. येथील दुकाने,  अवैध पॉर्कींग आणि कन्हान नदी रक्षाघाटा वरील लोकांच्या गर्दीला शहरात वाढता कोरोना प्रादुर्भाव रोख थाम करण्यास प्रतिबंधात्मक निर्बंध कोण लावणार ? असा ज्वलंत प्रश्नाची चर्चा शहरातील नागरिकांत जोर धरू लागली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

आयपीएल टी-२० क्रिकेट वर जुगार खेळताना आरोपीस पकडले :कन्हान पोलीसांची कारवाई

Thu Apr 29 , 2021
आयपीएल टी-२० क्रिकेट वर जुगार खेळताना आरोपीस पकडले.  #) कन्हान पोलीसांची कारवाई १,३९,६५० रूपयाचा मुद्देमाल जप्त.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत मा.परी.पो. उप अधिक्षक, कन्हान थानेदार यांनी अ़धिकारी व कर्मचा-यांसह तारसा रोड शहीद चौकात छापा मारून आयपीएल टी-२० क्रिकेट वर पैश्यांचा जुगार खेळतांना आरोपीस पकडुन १,३९,६५० रूपयांचा मुद्देमाल जप्त […]

Breaking News

Archives

Categories

Meta