वाहनाचा धडकेत हरणाच्या मृत्यू ; सावनेर येथील घटना

*वाहनाचा धडकेत हरणाच्या मृत्यू*
*कुत्र्याने तोडले लचके…*
*वन्यप्राण्याची पाण्यासाठी भटकंती…*
सावनेर : सकाळी हेल्थ युनिट येथे मृत अवस्थेत हरिन पडून असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना मिळाली, घटनास्थळी जाऊन पाहिले असता असे लक्षात आले की त्याच्या पायाला वाहनाची धडक लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर अवस्थेमध्ये हरिण हा हेल्थ युनिट मध्ये शिरला असावा.

गंभीर अवस्थेमध्ये असल्यामुळे कुत्र्याने त्याचे लचके तोडले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे, सावनेरचे नव्याने राजु झालेले ठाणेदार रवींद्र मानकर यांना माहिती  देण्यात आली, त्यांनी लगेच खापा फॉरेस्ट विभागामध्ये संपर्क करून, माहिती दिली, लगेच वन विभागाची टीम येऊन मृत असलेल्या हरणाला घेऊन गेले.
आजूबाजूच्या परिसरात वनक्षेत्र असल्याने वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे, कदाचित हे प्राणी पाण्याच्या शोधात आले असावे,हा अपघात रात्री एक ते दोन च्या सुमारास घडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रामधामचा उत्सवामधून निशुल्क सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रामधाम तीर्थक्षेत्र मनसर येथे पंधरा वर्षांत १२६६ निशुल्क विवाह संपन्न

Sun Apr 30 , 2023
रामधामचा उत्सवामधून निशुल्क सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रामधाम तीर्थक्षेत्र मनसर येथे पंधरा वर्षांत १२६६ निशुल्क विवाह संपन्न कन्हान,ता.३० एप्रिल चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर), आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रामधाम […]

You May Like

Archives

Categories

Meta