कन्हान शहरात बकरी ईद निमित्त राष्ट्रीय एकात्मता संदेश 

कन्हान शहरात बकरी ईद निमित्त राष्ट्रीय एकात्मता संदेश

कन्हान,ता.२९ जुन

    पटेल नगर, कन्हान येथील सुन्नी रज्जा मस्जिद मध्ये मुस्लिम बांधवानी बकरी ईद उत्साहाने साजरी करण्यात आली .

          गुरूवार (दि.२९) जुन ला मुस्लिम समाज बांधवानी बकरी ईद हा मोठा सण म्हणुन साजरा केला जातो. पटेल नगर, कन्हान येथील सुन्नी रज्जा मस्जिद येथे सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा, शांतता नांदावी यासाठी विशेष दुआ मागण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळा भेट करुन ईद च्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर मित्रासह आणि कुटुंबासह ईद मोठ्या उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली. प्रसंगी इमाम हिदायत रजा, शेख अकरम कुरेशी, अब्दुल लतीफ़ शेख़, मोह शफीक शेख, फिरोज मोहम्मद, फैयाज खान, शेख ज़ाकिर हुसैन, शाहनवाज़ शेख़, शादाब कुरेशी, नफीस खान, सोहैल ख़ान, इसराइल ख़ान, अनीश खान पठान, शाहिद खान, गौश मोहम्मद, आकिब सिद्धिकी, अल्फ़ाज़ शेख, अनस शेख, अर्शीद शेख, साहिल खान आदि सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी मुर्तीचे अभिषेक

Thu Jun 29 , 2023
आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी मुर्तीचे अभिषेक कन्हान,ता.२९ जुन    शहरातील शिवाजी नगर येथिल विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमाने आषाढी एकादशी महोत्सव उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.    गुरुवार ( दि.२९) जुन ला आषाढी एकादशी निमित्य शहरातील शिवाजी नगर, कन्हान येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी महिलांनी विठ्ठल […]

You May Like

Archives

Categories

Meta