६८ गोवंशाची सुटका करून २५ लाखांचा मुदेमाल सहित ५ आरोपींना अटक 

६८ गोवंशाची सुटका करून २५ लाखांचा मुदेमाल सहित ५ आरोपींना अटक

कन्हान,ता.२८

    पारशिवनी तालुक्यातील कन्हान शहरातील पोलिस स्टेशन हदीतील सिहोरा शिवारात गोशाळेत चालणारे अवैध पशु तस्करीची पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना माहीती झाल्याने त्यांनी गोवंश कत्तलीकरिता तस्करी करणाऱ्यांवर विशेष पथकाने ६८ गोवंशाच्या जीव वाचवुन २५ लाखांचा मुदेमाल सहित ५ आरोपींना अटक करून ३ आरोपीचा शोध सुरू केला.

           

    पोलिसांच्या माहिती नुसार, कन्हान नगर परिषद हदीतील पोलिस स्टेशन पासून दोन किलोमिटर अंतरावर अनेक वर्षापासुन रोशनी गौ शाळा येथे पशु तस्करी चालु असल्याने विशेष पथकाने रोशनी गौ शाळा येथे धाड मारली. ६८ पशु व ३ मृत सह एकुण ७१ पशु एका आइसर गाडी एम.ए.४० सी ९२७० मध्ये गोवंश कत्तलीकरिता तस्करी करणाऱ्या आठ आरोपीवर एस.पी.विशेष पथकाने पकडून कारवाई केली.

     नागपूर ग्रामीण कन्हान पोस्टे च्या हद्दीमध्ये अवैद्य धंद्यावर डोळा ठेवत मौजा सिहोरा शिवारात फिरत असताना आइसर गाडी आत ३० गोवंश जनावरे अत्यंत निर्दयतेने व क्लेशदायक पद्धतीने पायांना व मानेला दोरीने बांधून एकमेकांवर गोवंश जनावरे कोंबुन ठेवलेले दिसले. घटनास्थळावर भूषण ओंम प्रकाश तरारे (वय ३०) आझाद नगर, मोहम्मद सलिम मोहम्मद कुरेशी (वय ३२), मोहम्मद वसीम मोहम्मद सलीम कुरेशी (वय ३३), मोहम्मद रजा अब्दुल जब्बार कुरेशी (वय ३०) अल्ताफ अश्फाक अहमद कुरेशी (वय १९), नदीम सुलतान शेख (वय ३०) सर्व राहणार भाजी मंडी, कामठी रोशनी गो शाळा संस्थेचे विनोद कुमार यादव (वय ३५ ) रा.गवलीपुरा कन्हान आयसर वाहन एम.एच. ४० सि डी ९२७० चालक भूषण तरारे यांने आइसर गाडी चालक असून गाडी मालक जाफर काल्या रा.कामगार नगर नागपूर यांचे सांगण्यावरून गोवंश जनावरे कत्तली करिता घेऊन जात असल्याचे सांगितले.

   सिहोरा कन्हान येथुन रोशनी गो शाळेचा मालक विनोद यादव हा गो शाळेचा दुरुपयोग करून गोवंश कत्तलीकरिता विकताना मिळून आला. एकूण लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ६४ गोवंश जनावरे यात ३६ बैल २४ गाई ८ कारवळ अस ६८ गोवंश पशु पुढील देखरेखे करिता गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे दाखल करण्यात आले. तर तीन गोवंश जनावरे मृत मिळून आले. सर्व आठ आरोपी विरुद्ध अप क्र कलम ४२९, २४, १०९ भादवी सहकलम प्राण्यास छळ प्रतिबंध अधिनियम व महाराष्ट्र पशु स्वरक्षण अधिनियम १९७८ ८०A, B अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से), अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित पांडेय, पोलीस उपनिरीक्षक देविदास ठमके, पोलीस हवालदार निलेश बिजवाड़, पोलीस नायक महेश बिसने, पोलीस अंमलदार निखील मिश्रा, विशाल शंभरकर व अनिल करडखेले यांचेसह यांनी यशस्वीरित्या पार पाडली. पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मुस्लिम बांधवा द्वारे मिरवणुक काढत ईद ए मिलाद महोत्सव शांततेत 

Fri Sep 29 , 2023
मुस्लिम बांधवा द्वारे मिरवणुक काढत ईद ए मिलाद महोत्सव शांततेत कन्हान,ता.२९     प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जयंती चे औचित्य साधुन कन्हान शहरात मुस्लिम बांधवा द्वारे मिरवणुक काढुन ईद ए मिलाद महोत्सव शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडला.    गुरुवार (दि.२८) सप्टेंबर ला प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जयंती […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta