मुस्लिम बांधवा द्वारे मिरवणुक काढत ईद ए मिलाद महोत्सव शांततेत 

मुस्लिम बांधवा द्वारे मिरवणुक काढत ईद ए मिलाद महोत्सव शांततेत

कन्हान,ता.२९

    प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जयंती चे औचित्य साधुन कन्हान शहरात मुस्लिम बांधवा द्वारे मिरवणुक काढुन ईद ए मिलाद महोत्सव शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडला.

   गुरुवार (दि.२८) सप्टेंबर ला प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जयंती चे औचित्य साधुन सुन्नी रजा मस्जिद कमेटी द्वारे ईद ए मिलाद निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता पटेल नगर, कन्हान येथील सुन्नी रजा मस्जिद येथे मुस्लिम समाज बांधव एकत्र येऊन सामुहिक नमाज पठण करण्यात आले . त्यानंतर सुन्नी रजा मस्जिद येथुन मिरवणुक काढुन पटेल नगर , शिवाजी नगर, धरम नगर होऊन राष्ट्रीय महामार्गावरील आंबेडकर चौक, तारसा चौक, धर्मराज शाळा, धन्यवाद गेट कांद्री होत राष्ट्रीय महामार्गाने भ्रमण करीत मिरवणुकी चे पटेल नगर सुन्नी रजा मस्जिद येथे समापन करण्यात आले. विविध समाजिक संघटन द्वारे फुलाच्या वर्षाने, शरबत, फळ, अल्पोहार वितरण करुन मिरवणुकी चे जोरदार स्वागत करण्यात आले. ईद ए मिलाद आणि अनंत चतुर्दशी एकाच दिवशी आल्याने कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये म्हणुन कन्हान पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कन्हान शहरात ईद ए मिलाद महोत्सव शांततेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

     प्रसंगी जनाब इमाम हिदायत रज़ा, मौलाना जैनुला अबदीन, शेख़ अकरम कुरैशी, अब्दुल लतीफ शेख़, मोहम्मद शफीक शेख़, फिरोज मोहम्मद , एतेहशाम सय्यद , सहीद ख़ान, अज़ीम शेख़, शादाब कुरैशी, शेख शाहनवाज कुरैशी, मोहसिन खान(मम्पी), हाजी शेख़ शेर मोहम्मद, इल्यास शेख़, मोहसिन कुरैशी, चांद शेख़, अकबर सय्यद ,जूबेर खान, फिरोज खान, रशीद पठान, इसराइल शेख़ , चांद शेख़, इसराइल ख़ान, शाहरुख खान, ज़ाकिर कुरैशी, गौस मोहम्मद, सादिक अली, शाहिद रज़ा, नफीस खान, सह आदि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. सुन्नी रजा मस्जिद कमेटी ने नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक मा.डाॅ संदीप पखाले , उपविभागीय पोलीस अधिकारी मा. पुंडलिक भटकर , पोलीस निरीक्षक मा.सार्थक नेहेते , क्राईम ब्रांच पोलीस निरीक्षक यशवंत कदम , सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले , शालीकराम महाजन, शैलेश वराडे सह आदि पोलीस कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गणपती बाप्पा मोरया ...पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाचे निरोप  न.प. द्वारे कृत्रिम टँकचा व्यवस्था, पोलीसांच्या चोख बंदोबस्तात बाप्पाचे शांततेत विर्सजन

Fri Sep 29 , 2023
गणपती बाप्पा मोरया …पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाचे निरोप न.प. द्वारे कृत्रिम टँकचा व्यवस्था, पोलीसांच्या चोख बंदोबस्तात बाप्पाचे शांततेत विर्सजन कन्हान,ता.२९     कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात दहा दिवस गणेश मुर्तीची विधिवत पूजा अर्चना, भजन कीर्तन, विविध कार्यक्रम सादर करुन अनंत चतुर्दशी च्या दिवशी काली मंदिर नदी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta