मुलाने आईला गळयावर चाकु मारून जख्मी केले.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा (गणेशी) येथे आरोपी मुलाने दारू पिऊन येऊन पत्नीला शिवीगाळ करित असता आई मध्यस्थी करिता आली यावरुन तिलाही शिवीगाळ करून आईच्या गळयावर हंनवटी खाली चाकुने मारून जख्मी करून आरोपी मुलगा पळुन गेला.
सोमवार (दि.२६) ला सायंकाळी ६ ते ६.३० वाजता दरम्यान आरोपी मुलगा विकेस उर्फ विक्की इश्वरजी डडुरे (२९) रा बोरडा (गणेशी) हा दारू पिऊन घरी आला व आतुन दार बंद केले. त्याच्या पत्नी ने बाहेर अंगणात दिवा लावण्यास जाण्याकरिता म्हटले असता तिला शिवीगाळ करून झगडा करित असताना आरोपीची आई उमाबाई इश्वरजी डडुरे (६०) रा बोरडा (गणेशी) ही मध्यस्थी करिता आली असता आरोपी मुलाने तिलाही शिवीगाळ करून गॅस वोटयावरील भाजी कापण्याच्या चाकुने गळयावर हंनवटी खाली मारून जख्मी करून पळुन गेल्याने फिर्यादी आई च्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोलीसानी आरोपी मुलगा विक्की डडुरे यांचे विरूध्द अप क्र ३९९/२० कलम ३२४, ५०४ भादंवी नुसार गुन्हा नोंद करून पोउपनि जावेद शेख पुढील तपास करित आहे.