दिवाळी च्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषन : प्रवाशांची कोंडी

सावनेर : मागील 3 वर्षापासून रा . प . कर्मचाऱ्यांचा आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नाची सोडवणूक होत नसल्याने दि . 28.10.2021 पासून रा.प. सावनेर आगार समोर संयुक्त कृती समिती सावनेर आगाराचे पदाधिकारी आपल्या प्रलंबीत मागण्यांसाठी बेमुदत उपोषणास बसले असून त्यांनी आपल्या मागण्या दिवाळी पुर्वी पुर्ण करण्याची मागणी केली आहे . या बेमुदत उपोषणामुळे प्रवाश्यांच्या गैरसोई होत असून अनेक प्रवासी खाजगी वाहानांनी आपला प्रवास करतांना दिसत आहे .

यावेळी कर्मचाऱ्यांनी

1 ) राज्य सरकारी कामगारांप्रमाने रा . प . कामगारांना 3 टक्के वेतन वाढ देण्यात यावी .
2 ) राज्य सरकारी कामगारांप्रमाने रा . प . कामगारांना 8/16/24 टक्के घरभाडे भत्ता देण्यात यावा .
3 ) राज्य सरकार कामगारांप्रमाने रा . प . कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता देण्यात यावा .
4 ) सन उचल 12500 राज्य सरकारी कर्मचाऱ्या प्रमाणे देण्यात यावी .
5 ) दिवाळी बोनस रु .15000 रा . प . कामगारांनाही देण्यात यावा .


ईत्यादी मागण्या घेऊन आगार अध्यक्ष रफीक दिवाण , सचिव रवी सोमकुंवर , संजय करडभाजणे , चंद्रशेखर उमक , जगदीश बहुरूपी , प्रदीप पुराम , राजू घटे , राहुल हाडके , अश्विन पानोरे , सुनील जाधव , सुरेश लाखे , अभय अवसरमोल वाय . तवले , बी . सरनकर , नियाज अहमद , नामदेव राऊत , कृष्णा निकोसे ईत्यादी कामगार सावनेर आगाराच्या गेट समोर बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अपघातात चिमुकल्याचा मृत्यू , आई गंभीर : सावनेर ता. घटना

Fri Oct 29 , 2021
अपघातात चिमुकल्याचा मृत्यू , आई गंभीर सावनेर : तालुक्यातील बिडगाव जटामखोरा वळणावर समोरून येत असलेल्या चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने एका चार वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला . आई पुनम कैलास कुमरे या गंभीर जखमी झाल्यात , तर मामा परमेश्वर इवनाती किरकोळ जखमी झाला . मिळालेल्या माहितीनुसार बहिणभाऊ आणि भाचा हे […]

You May Like

Archives

Categories

Meta