अपघातात चिमुकल्याचा मृत्यू , आई गंभीर : सावनेर ता. घटना

अपघातात चिमुकल्याचा मृत्यू , आई गंभीर

सावनेर : तालुक्यातील बिडगाव जटामखोरा वळणावर समोरून येत असलेल्या चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने एका चार वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला . आई पुनम कैलास कुमरे या गंभीर जखमी झाल्यात , तर मामा परमेश्वर इवनाती किरकोळ जखमी झाला . मिळालेल्या माहितीनुसार बहिणभाऊ आणि भाचा हे तिघेही बिडगाववरून केलवद येथे दुचाकीने बाजाराला आले . बाजार करून परत जात असताना जटामखोरा वळणावर समोरून येत असलेल्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने गगन कुमरे ( वय ४ ) हा जोरात आदळल्याने त्याची मान तुटली व जागीच मरण पावला . गगनची आई पुनम कुमरे हिच्या डोक्याला जबर मार लागला , तर मामा परमेश्वर इवानाती हा जखमी झाला . घटनेची माहिती रायबासा जटामखोराचे उपसरपंच सोनू रावसाहेब तसेच सदस्य दीपक ढोबळे यांना मिळतात त्यांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना गाडीमध्ये टाकून सावनेर येथील शासकीय दवाखान्यात दाखल केले . चिमुकल्या गगनची मान तुटल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले . गगनच्या आईला डोक्याला जबर मार लागल्याने तिला नागपूर येथील मेडिकल येथे रवाना केले . पुढील तपास केळवद पोलिस करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान नप येथे कोव्हिड 19 संदर्भात बैठक संपन्न

Fri Oct 29 , 2021
*कन्हान नप येथे कोव्हिड 19 संदर्भात बैठक संपन्न* १००% नागरिकांचे लसीकरण करण्याचे तहसीलदारांचे आदेश कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत मागील दोन वर्षापुर्वी कोरोना चे थैमान चांगलेच पसरल्याने किती तरी लोकांना आॅक्सीजन सह योग्य उपचार तात्काळ न मिळाल्याने मृत्यु झाला असुन सध्याचा परिस्थिति शहरात कोरोना चे प्रार्दुभाव नसल्याने कन्हान […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta