कन्हान नप येथे कोव्हिड 19 संदर्भात बैठक संपन्न

*कन्हान नप येथे कोव्हिड 19 संदर्भात बैठक संपन्न*

१००% नागरिकांचे लसीकरण करण्याचे तहसीलदारांचे आदेश

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत मागील दोन वर्षापुर्वी कोरोना चे थैमान चांगलेच पसरल्याने किती तरी लोकांना आॅक्सीजन सह योग्य उपचार तात्काळ न मिळाल्याने मृत्यु झाला असुन सध्याचा परिस्थिति शहरात कोरोना चे प्रार्दुभाव नसल्याने कन्हान – पिपरी नगर परिषद येथे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली कोव्हिड 19 संदर्भात सर्व साधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकी मध्ये तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी नगर परिषद च्या अधिकार्यांना शहरात 100% नागरिकांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले असुन तहसीलदार यांनी लसीकरणा संबधी सर्व सदस्यांचा समस्या जाणुन घेतल्या व त्यावर तात्काळ उपाय योजना करण्याचे आश्वासन देऊन ही बैठक शांततेत पार पडली .
मागील दोन वर्षापुर्वी संपुर्ण देशा सह कन्हान शहरात व परिसरात कोरोना च्या प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात पसरल्याने किती तरी लोकांना आॅक्सीजन सह योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यु झाला असुन सध्याचा परिस्थिति शहरात व परिसरात कोरोना च्या प्रार्दुभाव नसल्याने कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे बुधवार दिनांक २७ आॅक्टोंबर ला दुपार च्या सुमारास तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या अध्यक्षतेखाली कोव्हिड 19 संदर्भात सर्व साधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकी मध्ये तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी शहरात १००% नागरिकांचे लसीकरण करण्याचे निर्देश नप अधिकार्यांना दिले . तसेच लसीकरणा संबधी सर्व सदस्यांचा समस्या जाणुन घेतल्या व त्यावर तात्काळ उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले . तसेच शहरातील काही प्रभागात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे अधिकार्यांचे कौतुक केले असुन नगरसेवक व नगरसेविकांनी केलेल्या जनजागृति आणि सहकार्या बद्द्ल तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी आभार व्यक्त केले .


या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक व माजी उपाध्यक्ष योगेंन्द्र रंगारी, नगरसेवक अनिल ठाकरे , राजेश यादव, राजेंद्र शेंदरे , मनिष भिवगडे, मनोनीत नगरसेवक शंकर चहांदे, नगरसेविका रेखा टोहणे , संगीता खोब्रागडे, पुष्पा कावडकर , सुषमा चोपकर, अनिता पाटील , कल्पना नितनवरे,मोनिका पौणिकर, कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी , संकेत तलेवार,नप कार्यालय अधीक्षक हर्षल जगताप, स्वच्छता अभियंता फिरोज बिसेन, नेहाल बढेल, सह आदि नप अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार संकेत तलेवार यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सर्प मित्रांनी दिले आठ फिट लांब धामण सापाला जिवनदान : सर्पमित्र बोरकर आणि सहका-यांचे अतुलनिय कामगिरी

Mon Nov 8 , 2021
सर्प मित्रांनी दिले आठ फिट लांब धामण सापाला जिवनदान #) सर्पमित्र बोरकर आणि सहका-यांचे अतुलनिय कामगिरी. कन्हान : – गांधी चौक कन्हान येथील पोलीस स्टेशन च्या बाजुला नगरपरिषद व्दारे नवनिर्मीत शौचा लायात दडुन बसलेल्या आठ फिट लांब धामण सापाला सर्प मित्र चन्द्रशेखर बोरकर अध्यक्ष, वाईल्ड लाईफ सोसाय टी कन्हान, पारशिवनी यांनी […]

You May Like

Archives

Categories

Meta