कन्हान नगरपरिषद येथे हर घर दस्तक उपक्रमा संर्दभात बैठक संपन्न

कन्हान नगरपरिषद येथे हर घर दस्तक उपक्रमा संर्दभात बैठक संपन्न

कन्हान : – नगरपरिषद नवीन इमारत येथे हर घर दस्तक उपक्रमा संदर्भात बैठक तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी हर घर दस्तक उपक्रम संदर्भात माहिती देत शहरातील सर्व घरातील प्रत्येक व्यकतीचे लसीकरण करण्याचे आवाहन केले  व नप मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी शिक्षक, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका यांच्या समस्या जाणुन घेतल्या.


गुरूवार (दि.२५) नोव्हेंबर ला केंद्र शासनाच्या हर घर दस्तक उपक्रम संदर्भात मा तहसिलदार प्रशांत सांगडे यांच्या अध्यक्षतेत शिक्षक, आशा सेविका, आंगनवाडी सेविका यांची बैठक घेऊन तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी सर्वांना हर घर दस्तक उपक्रमा संदर्भात माहिती दिली व कन्हान शहरातील सर्व घरामध्ये व घरातील प्रत्येक व्यक्तींचे लसीकरण व्हायला पाहीजे असे आवाहन केले. नप मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी लसीकरण संर्दभात शिक्षक, आशा सेविका, आंगनवाडी सेविका यांच्या समस्या जाणुन घेतल्या. याप्रसंगी पारशिवनी तहसिलदार प्रशांत सांगडे, नप मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी, नोडल अधिकारी संकेत तलेवार, कार्यालय अधिक्षक हर्षल जगताप, स्वच्छता अभियंता फिरोज बिसेन सह शिक्षक वृंद, आशा सेविका, आंगण वाडी सेविका, नप अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सर्वधर्म समभाव संघटना द्वारे संविधान दिवस थाटात साजरा व शहिदांना दिली श्रद्धांजलि

Mon Nov 29 , 2021
*सर्वधर्म समभाव संघटना द्वारे संविधान दिवस थाटात साजरा व शहिदांना दिली श्रद्धांजलि* कन्हान – सर्वधर्म समभाव संघटना द्वारे संविधान दिवस व शहिद दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व संविधानाचे वाचन करुन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta