सर्वधर्म समभाव संघटना द्वारे संविधान दिवस थाटात साजरा व शहिदांना दिली श्रद्धांजलि

*सर्वधर्म समभाव संघटना द्वारे संविधान दिवस थाटात साजरा व शहिदांना दिली श्रद्धांजलि*

कन्हान – सर्वधर्म समभाव संघटना द्वारे संविधान दिवस व शहिद दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व संविधानाचे वाचन करुन संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला .


शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर ला सर्वधर्म समभाव संघटना द्वारे संविधान दिवस व शहिद दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश बर्वे यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान , कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे , उपनिरीक्षक जावेद शेख , रोहित बर्वे सह आदि प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात संविधानाचे वाचन करण्यात आले . कार्यक्रमात उपस्थित उपस्थित सर्व नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला .
तसेच मुंबई दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .
या प्रसंगी प्रशांत मसार , राजन तिवारी , कवडु पडोती , रविंन्द्र दुपारे , रामेश्वर ठाकुर , मिलींद मेश्राम , विलास शेंडे , अजय कापसीकर , मुकेश गंगराज सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रशांत मसार , चंदन मेश्राम , दिपक तिवाडे , अक्षय फुले , शुभम मंदुरकर सह आदि नागरिक उपस्थित राहुन सहकार्य केले .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रशांत मसार यांनी केले तर आभार चंदन मेश्राम यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान येथे विश्व एड्स दिवस निमित्य नागरिकांना निरोध वाटुन केली जनजागृति

Thu Dec 2 , 2021
*कन्हान येथे विश्व एड्स दिवस निमित्य नागरिकांना निरोध वाटुन केली जनजागृति* मानवाधिकार संरक्षण संघटन द्वारे आयोजन कन्हान – कन्हान येथे विश्व एड्स दिवस निमित्य मानवाधिकार संरक्षण संघटन द्वारे जनजागृति अभियानाचे आयोजन करण्यात आले असुन नागरिकांन मध्ये जनजागृति करुन व नागरिकांना निरोध वाटप करुन विश्व एड्स दिवस साजरा करण्यात आला . […]

You May Like

Archives

Categories

Meta