सोळा निर्दोष लोकांना चोरीचा संशय घेऊन मारहाण  गहुहीवरा गावकऱ्यांना महिलां, पुरुषांनी मागीतली जिवेची भिक 

सोळा निर्दोष लोकांना चोरीचा संशय घेऊन मारहाण

गहुहीवरा गावकऱ्यांना महिलां, पुरुषांनी मागीतली जिवेची भिक

 कन्हान,ता.२९ डिसेंबर

      कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील गहुहिवरा शिवार येथे गावकऱ्यांनी चोरीच्या संशया वरुन‌‌ सोळा लोकांना लाठी- काठीने, हातबुक्याने मारहण करुन गंभीर जख्मी केल्याने पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून १० ते १५ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला.

    पोलिसांच्या माहिती नुसार, मंगळवार (दि.२७) डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता च्या दरम्यान रोहन विजु दुधे (वय-२८) रा.रेल्वे पंचायत समिति, ताज दरगाह, कामठी यांच्या सोबत शेजारी राहणारे प्रवीण अमीर खान (वय-३०) सौ.विना इशांत मासुरकर (वय२२) सुरेशा विजु दुधे (वय ४३)सौ.रोशनी आकाश संतापे (वय-२५) वर्ष सौ.कंचन संदिप वैरागडे (वय२३) ग.भा सीमा प्रकाश उईके (वय-४०) ग.भा माया विकास उईके (वय-३५) सौ.शोभा बावनगडे (वय-३०) सौ.कोमल किशोर सुखदेवे (वय-२५) हर्षल प्रकाश उईके (वय-१९) मनीष गणेश तळसे (वय-१९) शाफिक सईद सलाम, कपील कुंदन रंगारी (वय-१४) विशाल संजय वैरागडे (वय-३१)सलमान हुसैन (वय-२०) सर्व राहणार रा.रेल्वे पंचायत समिति, ताज दरगाह, कामठी‌ राहतात. निळ्या रंगाची बजाज मॅक्सीमा ऑटो रिक्षा क्रं.एम.एच ४०भी एफ १७८८ यांने अरोली येथे कबाडी साहित्य विकण्या करण्या करिता गेले. अरोली तसेच जवळ पासचे निमखेडा, चाचेर, केरडी, निसतखेडा, गहुहिवरा गावात जाऊन कबाड जमा करुन निमखेडा गावातील रेल्वे स्टेशन च्या बाजुला असलेल्या विक्रेत्याला कबाड विकुण जेवण करुन सायंकाळी ७:३० वाजता च्या दरम्यान सर्व कामे आटोपून बजाज मॅक्सीमा ऑटो क्रं. एम एच ४० भी एफ १७८८ मध्ये बसवुन रोहन दुधे हे लोकांना सोबत घेऊन निमखेडा गहुहिवरा मार्गाने कामठी कडे जात होते. निमखेडा गावातील काही युवक रोहन यांचा गाडीला बघुन रागात ओरडुन चोर चोर म्हणुन गाडीच्या मागे येऊ लागले . रोहन यांचा गाडीचा चालक सलमान हुसैन यांने त्या लोकांना बघुन घाबरत. गाडी तीव्र गतीने कन्हान कडे येत असतांना गहुहिवरा गावात १० ते १५ अनोळखी लोकांनी रोहन यांचा गाडी समोर ट्रॅक्टर उभा करुन रोहन यांची गाडी थांबवली. लोकांना पाहुन जोरजोरात हे लोक चोर आहे असे म्हणू लागल्याने वाहन मधील लोक घाबरले. तेथील १० ते १५ अनोळखी युवकांनी हातात लाठी व काठी घेऊन मारायला सुरवात केल्याने रोहन यांचा डोक्याला आणि डाव्या हाताच्या पंजाला जबर मार लागुन रक्त निघाले. तर सोबत असणारे ग.भा माया उईके, सौ.विना मासुरकर , प्रवीन खान, सौ.कोमल सुखदेवे, ग.भा सीमा उईके, मनीष तळसे यांना सुद्धा लोकांनी लाठी-काठीने आणि हातबुक्याने मारहण करुन जख्मी केले. कपील रंगारी, विशाल वैरागडे, सलमान हुसैन हे आपल्या लोकांना मार खात असतांना पाहुण शेतात पळुन गेले. घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस हवालदार जयलाल सहारे , सम्राट वनपर्ती घटनास्थळी गेले. तेथील वातावरण शांत करुन रोहन सह अन्य जख्मी लोकांना घेऊन पोलीस स्टेशन येथे आणले. कन्हान पोलीसांनी रोहन दुधे यांचा तक्रारी वरून अज्ञात १० ते १५ आरोपी विरुद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक फुलझले करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

"गण गणात बोते" श्री च्या गजरात दुमदुमली कन्हान नगरी  "श्री" च्या पालखीचे कन्हान- कांन्द्री नगरीत भव्य स्वागत

Thu Jan 5 , 2023
“गण गणात बोते” श्री च्या गजरात दुमदुमली कन्हान नगरी “श्री” च्या पालखीचे कन्हान- कांन्द्री नगरीत भव्य स्वागत कन्हान,ता.०४ जानेवारी     श्री संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी, नागपुर व्दारे श्री संत गजानन महाराजांची नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायदळ पालखीचे सत्रापूरच्या काली माता मंदिर परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले.   […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta