धुळीवंदन च्या दिवसी कांद्री ला युवकाच्या पोटावर चाकु मारून केले जख्मी : चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

धुळीवंदन च्या दिवसी कांद्री ला युवकाच्या पोटावर चाकु मारून केले जख्मी. 

#) कन्हान पोलीस स्टेशनला चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. 

पारशिवनी (कन्हान) : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्र ४ शिवनगर येथे चार आरोपींनी फिर्यादी नंद किशोर साहनी याचा मित्र विशाल चव्हान च्या पोटावर चाकु मारून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी नंदकिशोर साहनी याच्या तक्रारी वरून चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

          प्राप्त माहिती नुसार सोमवार दिनांक २९ मार्च ला धुलिवंदन (होळी) च्या दिवशी दुपारी २.३० ते ३. ३० वाजता च्या सुमारास फिर्यादी नंदकिशोर चंधारी साहनी वय १९ वर्ष रा. वार्ड क्र ४ शिवनगर कांद्री व फिर्यादी चा मित्र विशाल चव्हान हे आपल्या राहते घरा च्या समोर होळी सण साजरा करित असतांना आरोपी १) फ्रॅंक अंथ्थोनी रा. हनुमान नगर कांद्री, २) अजय चौहाण रा. कांन्द्री व ३) सुरेंन्द्र कुलदीप रा. अशोक नगर कन्हान हयानी येऊन म्हटले कि यहा दारू कहा मिलती है ! तर फिर्यादी नंदकिशोर साहनी ने म्हटले कि दारू यहा मिलती नहीं, और मुझे पता नहीं असे म्हटले तर आरोपी सुरेंन्द्र कुलदीप याने शिवीगाळ करित म्हटले कि तुमको मालुम नही क्या दारू कहा मिलती है असे म्हणुन फिर्यादी नंदकिशोर साहनी व त्याचा मित्र विशाल चव्हान यांना धक्का-बुक्की करून मारपीट केली. परत पुन्हा आरोपी फ्रॅंक अंथोनी, अजय चौहाण व  राॅयल चाफले हयानी येऊन त्यानी सुद्धा फिर्यादी नंदकिशोर साहनी व त्याचा मित्र विशाल चव्हान यांना मारपीट करून आरोपी अजय चौव्हाण याने फिर्यादी नंदकिशोर साहनी चा मित्र विशाल चव्हाण याच्या पोटावर चाकु मारून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी नंदकिशोर साहनी यांचा तक्रारी वरून चारही आरोपी विरुद्ध कलम २९४, ३०७, ३४ भा.द.वी नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोउपनि कन्हान पुढील तपास करीत आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

संत तुकाराम महाराज बीज साजरी : कन्हान

Tue Mar 30 , 2021
संत तुकाराम महाराज बीज साजरी.   कन्हान : – संत तुकाराम नगर कन्हान येथे संत तुकाराम महाराज यांची बीज कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करित छोटेखानी कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.        मंगळवार (दि.३०) मार्च ला संत तुकाराम नगर कन्हान येथील संत तुकाराम महाराज मंदीरात संत तुकाराम महिला भजन मंडळा व्दारे […]

You May Like

Archives

Categories

Meta