संत तुकाराम महाराज बीज साजरी : कन्हान

संत तुकाराम महाराज बीज साजरी.  

कन्हान : – संत तुकाराम नगर कन्हान येथे संत तुकाराम महाराज यांची बीज कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करित छोटेखानी कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. 

      मंगळवार (दि.३०) मार्च ला संत तुकाराम नगर कन्हान येथील संत तुकाराम महाराज मंदीरात संत तुकाराम महिला भजन मंडळा व्दारे मंदीरातील संत तुकाराम महाराज व सर्व मुर्तीस पुष्पहार अर्पण करून छोटेखानी कार्यक्रमाची सुरूवात करून भजन, आरती व दहीकाला प्रसाद वितरण करण्यात आला.

मराठा सेवा संघ कन्हान व्दारे शांताराम जळते, ताराचंद निंबाळकर, मोतीराम रहाटे, सुनिता ईखार हयांनी संत तुकाराम महाराज च्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांचा जय घोष करित अभिवादन करून कोरोना नियमाचे पालन करित संत तुकाराम महाराज बीज साजरी केली. कार्यक्रमास प्रमिला मते, लक्ष्मी गडे, पुष्पा खर्चे, लता मोंडे, लता मेहेर, डोणारकर काकु, रेवतकर काकु आदीने सहकार्य केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात ११२ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक : कोरोना अपडेट  

Tue Mar 30 , 2021
कन्हान परिसरात ११२ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक #) कन्हान चाचणीत ६६ (दि.२७) स्वॅब चाचणीत १० व (दि.२८) च्या स्वॅब चाचणीचे २९ व साटक चाचणीत ७ असे एकुण ११२ रूग्ण आढळले.  #) कन्हान परिसरात ११२ रूग्ण आढळुन एकुण १८२६ रूग्ण.       कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान […]

You May Like

Archives

Categories

Meta