पिकअप वाहनाने १७ गाय, गोरे अवैद्य कत्तलीकरिता नेतांना पकडले : कामठी

पिकअप वाहनाने १७ गाय, गोरे अवैद्य कत्तलीकरिता नेतांना पकडले.

#) ४ गोरे मृत, पाच लाखाच्या मुद्देमाला सह दोन आरोपींना अटक. 

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मध्य प्रदेशातुन कत्तली करिता कामठी ला योध्दा पिकअप वाहनात अवैधरित्या १७ जनावरे कोबुन भरून नेताना कन्हान पोलीसांनी पकडुन पाच लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करित दोन आरोपीस अटक केली.  

     कन्हान पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून मंगलवार (दि.२९) ला रा त्री १० वाजता दरम्यान बोरडा रोड टोल नाका जवळ मध्य प्रदेशातुन कत्तलीकरिता कामठी ला योध्दा पिकअप वाहन क्र. एम एच ४० – बी एल – ११३८ मध्ये अवैधरित्या १७ (सतरा) गाय, गोरे असे १७ जनावरे कोबुन भरून निर्दयीपणे पाय व शिंगे दोरीने बांधुन चा-याची सोय न कर ता नेताना कन्हान पोलीसांनी पकडले. यात १७ गाय, गोरे किंमत एक लाख पंचविस हजार रूपयाचे यातील चार गाई मृत पावल्या, योध्दा पिकअप वाहन किंमत चार लाख असा एकुण पाच लाख पंचविस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून

आरोपी १) मोहम्मद अल्ताफ अब्दुल मोहम्मद ईकबाल वय ३२ वर्ष रा. सैलाब नगर कामठी, आरोपी २) मो. हसिन शेख. मतिन शेख वय २० वर्ष रा. भाजीमंडी कामठी यांना अटक केली. उशीरा रात्री गोरक्षण देवलापार ला १३ ही जनावर पोहचवुन त्याना जिवनदान दिले. व मृत चार जनावराचे गोरक्षणचे वैद्यकिय अधिकारी यानी श्वविच्छेदन  ची केले. कन्हान पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरिक्षक चन्द्रकांत मदने यांनी गुन्हा नोंद करून आरोपी विरूध्द कलम ११ (१), (एच), ५ (ए),५ (ब) व मोटर वाहन कायदा १८४ भादवी ४२९ नुसार गुन्हा दाखल करित दोनही आरोपींना अटक केली. पुढील तपास हे.कॉ. कृणाल पारधी करित आहे. ही कारवाई पी एस आय शेख, पी एस आय सुरजुसे, कॉ. मंगेश सोनटक्के, राजेन्द्र गौतम, जिंतु गावंडे आदीने करून १३ गाय, गोरे मुक्या जनावरांना जिवनदान दिले. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान परिसरात नविन ८ रूग्ण : कन्हान

Wed Sep 30 , 2020
कन्हान परिसरात नविन ८ रूग्ण  #) कन्हान १, कांद्री ४, गोंडेगाव १, आमडी १, डुमरी(कला) १असे ८ रूग्ण,  कन्हान परिसर ७५०.   कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र साटक व्दारे (दि.२९) ला स्वॅब ९ चाचणीचे २ रूग्ण (दि.३०) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे […]

You May Like

Archives

Categories

Meta