स्टार बसेस त्वरित सुरु करण्याची मांगणी : कन्हान शहर विकास मंच

स्टार बसेस त्वरित सुरु करण्याची मांगणी

#) कन्हान शहर विकास मंच चे नागपुर महानगर पालिका अति. आयुक्त संजय निपाने ना निवेदन. 

कन्हान : – संपुर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणु आजारांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मार्च महिन्यात टाळेबंदी व संचारबंदी मुळे नागपुर शहारातील स्टार बसेस मागील सहा महिन्यापासुन बंद आहेत. लॉक डाऊन मध्ये शिथिल करून हळुहळु सर्व कामधंदे सुरू करण्यात येत असल्याने प्रवाश्याना होणारा त्रास व  स्टार बसेस चालक व वाहक यांचेवर उपासमारीची वेळ येऊन ठेपल्याने यास्तव कन्हान शहर विकास मंच चे उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने यांनी नागपुर महानगर पालिका चे महापौर संदीप जोशी, अति. आयुक्त संजय निपाने आणि बालाजी बोरकर साहेब यांना भेट घेऊन याविषयी चर्चा करून कन्हान शहर परिसरातील बहुतेक लोक रोजी रोटी कमविण्या करिता नागपुर, हिंगणा, बुटीबोरी स्टार बसेस नी ये-जा करित असतात तसेच येथील युवक स्टार बस मध्ये चालक व वाहक म्हणुन काम करतात नागरिकांचा उदर्निवाहाचा प्रश्न मार्गी लागावा. यास्तव  

कन्हान शहर विकास मंचचे अध्यक्ष प्रवीण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, हरीओम प्रकाश नारायण, पौर्णिमा दुबे, सुषमा मस्के, ओम कुंभलकर आदीनी निवेदन देऊन त्वरित स्टार बस सुरु करण्याची मांगणी केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला नविन एक रूग्ण आढळला : कोरोना अपडेट

Fri Oct 30 , 2020
कन्हान ला नविन एक रूग्ण आढळला #) ३० संशयिताच्या चाचणीत निगेटिव्ह, रामटेक येथुन एक रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८४५.    कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ३० संशयिताच्या रॅपेट व स्वॅब (आरटीपीसीआर) चाचणी घेण्यात आली. यात सर्व निगेटिव्ह रूग्ण परंतु रामटेक […]

You May Like

Archives

Categories

Meta