आज कन्हान नगर परिषद कार्यालय समोर ठिय्या आंदोलन

आज कन्हान नगर परिषद कार्यालय समोर ठिय्या आंदोलन

कन्हान,ता.३० नोव्हेंबर

    शहरातील राष्ट्रीय महामार्ग वरील बंद असलेली हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा विकल्या नंतर स्थानिक दुकानदारां मध्ये नगर परिषद प्रशासन विरुद्ध तीव्र रोष निर्माण झाल्याने आज कन्हान-पिपरी नगर परिषद कार्यालय समोर व्यापारांचा सर्व पक्षीय नेत्यांनी आणि विविध संघटनेनी ठिय्या आंदोलन करण्याचे ठरले आहे.

   कन्हान-पिपरी येथील बंद पडलेल्या औद्योगिक कंपनी ब्रुक बॉन्ड ही हिंदुस्तान लिव्हर लि.कंपनी ला विकण्यात आली. ही कंपनी चालु होऊन शहरात रोजगार मिळणार परंतु हिंदुस्तान लिव्हर लि. कंपनी सुध्दा बंदच राहिल्याने जागा ओसाड झालेल्या अवस्थेत असल्याने (दि.५) नोंव्हेबर २०१८ ला कन्हान- कांद्री दुकानदार महासंघा च्या पदाधिकारी व दुकानदारांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या जागेवर मार्केट यार्ड, हाॅकर्स झोन, आठवळी बाजार, बस स्टैंड आणि शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता उपयोगात घेण्याची मागणी केली होती. परंतु नगरपरि षद प्रशासनाने सदर विषया कडे गंभीर्याने लक्ष केंन्द्रीत न केल्याने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जागा विकण्यात आली. यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासा वर प्रश्न निर्माण झाला ? मागील कित्येक वर्षापासुन शहरात  जागा उपलब्ध नसल्याने राष्ट्रीय चारपदरी महा मार्गावर गुजरी आणि आठवळी बाजार भरत असल्याने नागरिकांना व दुकानदारांना जिव मुठीत घेऊन सामानाची खरेदी विक्री करावी लागत आहे. यास्तव विविध संघटने द्वारे अनेकदा नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन प्रशासनाने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जागा विकत घेण्याची मागणी केली. मात्र नगर प्रशासनाने शासनाला सुद्धा पत्र व्यवहार न केल्याने आज हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा बाहेरील ले-आऊट धारकांना विकण्यात आल्याने समोर फुटपाथ वर बसलेले दुकानदारांना हटविण्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. आठवळी व गुजरी बाजार रस्त्यावर भरत असुन बस स्थानकांची जागे अभावी, व्यवस्था नाही. पोलीस स्टेशन ला सुध्दा जागा नसतांना त्यांची व्यवस्था कुठे होईल ? असा प्रश्न उपलब्ध असतांना सुुध्दा हिंन्दुस्तान लिव्हर कंपनी ची जागा ज्यांनी विक्री केली. त्यामुळे स्थानिक फुटपाथ दुकानदारांचे नगर परिषद प्रशासन विरुद्ध तीव्र रोष निर्माण झाल्याने व हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा नगर परिषद प्रशासनाने शहराच्या विकासा करिता सरकारच्या माध्यमातुन खरेदी करून येथे मार्केट यार्ड, हॉकर्स झोन, चिल्लर, ठोक भाजीपाला विक्रेता दुकानदार, आठवळी व गुजरी बाजार, बस स्थानक, पोलीस स्टेशन आदी शहराचा सर्वांगीन विकासाच्या दुष्टीने या एकमेव असलेल्या जागेचा उपयोग करण्याचा मागणी करीता आज बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर ला दुपारी १२:०० वाजता पासुन कन्हान – पिपरी नगर परिषद कार्यालय समोर व्यापारांचे सर्व पक्षीय नेत्यांचे आणि विविध संघटने चे ठिय्या आंदोलन करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसंगी सर्व स्थानिक, फुटपाथ दुकानदारांनी, सर्व पक्षीय नेत्यांनी, विविध संघटने च्या पदाधिकार्यांनी व सदस्यांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे. असे कडकडीचे आव्हान कन्हान – कांद्री दुकानदार महासंघाचे अध्यक्ष अकरम कुरैशी यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सर्व पक्षीय ठिय्या आंदोलनाला यश नगरध्यक्षा 2 डिसेंबरला विशेष सभा घेणार

Wed Nov 30 , 2022
सर्व पक्षीय ठिय्या आंदोलनाला यश नगरध्यक्षा 2 डिसेंबरला  विशेष सभा घेणार कन्हान,ता.३० नोव्हेंबर       सर्व पक्षीय कन्हान शहरवाशी व सामाजीक कार्यकत्यांच्या व व्यापारी संघ यांच्या पुढाकाराने बुधवार (ता.३०) नोव्हेंबर रोजी कन्हान नगर परिषदेच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.      हिंदूस्थान लिव्हर लि.कंपनी ची १८.५ एकर जागा ग्रोमर वेंचर […]

You May Like

Archives

Categories

Meta