आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना (आयटक) चे तालुका अधिवेशन संपन्न
कन्हान : – नगरपरिषद नवीन इमारत येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक संघट ना (आयटक) चे पारशिवनी तालुका अधिवेशनात पारशिवनी तालुका कमेठीची नियुक्ती करून अधिवेशन संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्यामजी काळे तर प्रमुख ज्योती अंडरसहारे, सुनिता मानकर यांच्या प्रमुख उप स्थित पारशिवनी तालुका अधिवेशनाची सुरूवात करू न आशा वर्कस कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्याकरिता आंदोलन तीव्र करण्याचा संकल्प घेऊन तीन वर्षाकरिता पारशिवनी तालुका कमेटीची निवड करण्यात आली. यात अध्यक्षा- कौशल्या गणो रकर, कार्याध्यक्ष- सुनिता हांडे, कोषाध्यक्ष- निर्मला पवार, उपाध्यक्ष – नलीनी शिंगणे, वैशाली बोरकर, संगीता चौधरी, सचिव- सारिका धारगावे, सहसचिव- शिल्पा बागडकर, रंजनी चकोले, लेंडे ताई , कमल मारबते, कार्यकारणी सदस्य- धनश्री खेडेकर, वंदना शेंडे, प्रमिला घोडेस्वार, छाया सवईतुल, बिंदु साहनी आदींची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ता विक कौशल्या गणोरकर यांनी केले असुन सुत्रसंचाल न सारिका धारगावे यांनी तर आभार निर्मला पवार यांनी मानले.