कन्हान पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला :तीन लाख तीन हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त

कन्हान पोलीसांनी अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला

#) तीन लाख तीन हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त. 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पांधन रोड हनुमान नगर कन्हान येथे कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत अस तांना एक ट्रैक्टर अवैध रेती वाहतुक करित असतांना मिळुन आल्याने त्याचा जवळुन रेती, ट्रॅक्टर व ट्राली असा एकुण तीन लाख तीन हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई करण्यात आली आहे.

       प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.२९) जुलै २०२१ ला सायंकाळी ६:३० वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस पांधन रोड हनुमान नगर येथे पेट्रोलिंग करीत असतांना लाल रंगाचा ट्रैक्टर चालक संतोष केशव उईके वय २८ वर्ष राह. कुंभलकर ढाबा कन्हान हा ट्राली मध्ये अवैधरित्या रेती वाहतुक करतांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी विचारपुस केली असता राॅयल्टी नसल्याने कन्हान पोलीसांना निष्पन झाल्याने कन्हान पोलीसांनी चालकाच्या ताब्यात जवळुन एक ब्रास रेती किंमत ३००० रुपये, ट्रैक्टर ट्राली किंमत ३,००,००० रुपये असा एकुण ३,०३,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन ला आणु न सरकार तर्फे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे यांच्या तक्रारीवरून मालक मुरलीधर बाबुराव येलुरे व चालक संतोष केशव उईके यांच्या विरुद्ध कल म ३७९, १०९ भांदवि नुसार गुन्हा दाखल करून गुन्ह्य चा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे, शरद गिते, राजेंद्र गौतम, दिपक कश्यप सह पोलीस कर्मचा-यानी सापळा रचुन ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कांतीसिंह नाना पाटील जयंती साजरी : कन्हान

Wed Aug 4 , 2021
कांतीसिंह नाना पाटील जयंती साजरी. कन्हान : –  नगरपरिषद कन्हान पिपरी कार्यालयात  कांतीसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.          मंगळवार (दि.३) ऑगस्ट २०२१ ला नगरपरिषद कन्हान-पिपरी कार्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्य नगरपरीषद कन्हान नगराध्यक्षा करूणाताई अनिल आष्टनकर यांचा हस्ते क्रांतीसिंह    नाना पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta