पाषाण भींतीमध्ये शिरला कोरोना

अकोला : आज सकाळी रविवार (ता.२८) ७८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात अकोला जिल्हा कारागृहातील ५० पुरुष कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित २८ जणांमध्ये ११ महिला व १७ पुरुष आहेत. पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण, पोपटखेड ता.अकोट येथील सहा जण, राजदे प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित अकोट, बार्शी टाकळी, देवी खदान, अशोक नगर, जुने शहर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक अशोकनगर येथील ६२ वर्षीय पुरुष असून हा रुग्ण दि.२६ रोजी दाखल झाला व त्याच दिवशी मयत झाला. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. तर अन्य मयत हा बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून तो दि.१४ रोजी दाखल झाला होता त्याचा काल रात्री मृत्यू झाला.

 

आता सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १४९८
    मयत-७६ (७५+१), डिस्चार्ज-१०४७
    दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३७८
    (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले

Sun Jun 28 , 2020
पोलिसांनी तीन तासात लावला आरोपींचा छडा! पिंपळगाव राजा(वार्ताहर)-: पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ग्राम टाकळी तलाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात कलम ३६३ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळी तलाव येथील आरोपी युवक शरीफ शहा […]

Archives

Categories

Meta