फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले

पोलिसांनी तीन तासात लावला आरोपींचा छडा!

पिंपळगाव राजा(वार्ताहर)-: पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ग्राम टाकळी तलाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात कलम ३६३ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळी तलाव येथील आरोपी युवक शरीफ शहा शब्बीर शहा वय २० वर्ष याने गावातील एका अल्पवयीन मुलीला विविध प्रकारचे अमिश दाखवून फूस लावून पळवून नेले.सदर चा प्रकार त्या मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आला असता त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन गाठून झालेल्या प्रकाराची तक्रार दाखल करून ठाणेदार सचिन चव्हाण यांच्यासमोर झालेला प्रकार कथन केला असता पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्रे फिरविली.यामध्ये पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल चे लोकेशन घेऊन तपासाला सुरुवात केली,मात्र ढगाळ वातावरणामुळे लोकेशन मध्ये अडथळा येत असल्याने पोलिसांनी टाकळी तलाव व गिरोली परिसरात आपला मोर्चा वळविला.तद्नंतर सदर आरोपीचे मोबाईल लोकेशन आढळून आल्याने पोलिसांनी आरोपी व मुलीला गिरोली परिसरातून ताब्यात घेतले.या घटनेचा तपास ठाणेदार सचिन चव्हाण यांनी पोलीस कर्मचारी विजय मिरगे,विनोद भोजने यांच्या माध्यमातून मोठ्या शिताफीने तीन तासातच पार पाडून आरोपीला बेड्या ठोकल्या.या प्रकरणी आरोपी शरीफ शहा याला पोलीस उद्या खामगाव येथील न्यायालयात हजर करणार आहेत.पोलिसांनी आरोपी युवक व या प्रकरणी बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीला ठाणेदार सचिन चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात आणून त्या मुलीला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले.या घटनेमुळे ठाणेदार सचिन चव्हाण यांनी अशा घटनांना मुलींनी बळी पडू नये असे आवाहन केले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ विजय मिरगे,पो कॉ विनोद भोजने करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

माध्यमांची मुस्कटदाबी थांबवा !

Sun Jun 28 , 2020
  अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व खामगाव प्रेस कलब खामगाव चे वतीने तहसीलदार श्री.शितल रसाळ साहेब यांना निवेदन. खामगाव-अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व खामगाव प्रेस कलब खामगाव यांच्या वतीने आज औरंगाबाद येथील संपादक व टीम वरील नाहकचे दाखल गुन्हे तत्काळ मागे घ्या व माध्यमांची मुसकुटदाबी थांबवा अशा आशयाचे […]

Archives

Categories

Meta