बुलडाणा जिल्ह्यात आज 17 कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अलर्ट : प्राप्त 77 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह

तीन रूग्णांची कोरोनावर मात
बुलडाणा,(जिमाका) दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 94 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 77 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये आळसणा ता. शेगांव येथील 72 वर्षीय महिला, सुलतानपूर ता. लोणार येथील 55 वर्षीय महिला व 23 वर्षीय पुरूष, धोत्रा भणगोजी ता. चिखली येथील 50 वर्षीय पुरूष, साखरखेर्डा ता. सिं. राजा येथील 48 वर्षीय पुरूष व सरंबा ता. दे.राजा 49 वर्षीय पुरूष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे.

तसेच मंगल गेट मलकापूर येथील 17 वर्षीय तरूण, 27 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महिला, 31 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरूष व आळंद ता. मलकापूर येथील 19 वर्षीय महिला संशयीत रूग्ण पॉझीटीव्ह आले आहे. तसेच बस स्थानका जवळ खामगांव येथील 34 वर्षीय महिला, खामगांव येथील 40 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय युवक, 35 वर्षीय महिला व 78 वर्षीय वृद्ध पुरूष रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अशाप्रकारे 17 अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे.

तसेच आज 3 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये संग्रामपूर येथील 33 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय महिला व 2 वर्षीय मुलीचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 2511 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 147 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 147 आहे. तसेच आज 29 जुन रोजी 94 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 17 पॉझीटीव्ह, तर 77 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 100 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2511 आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 230 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 147 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 72 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गावोगावी भजन कीर्तनाला किमान ५० भाविकांना परवानगी द्या

Mon Jun 29 , 2020
  विश्व वारकरी सेना जिल्हाध्यक्ष गजानन महाराज दहिकर संग्रामपुर [ प्रतिनिधी] शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे लॉकडाऊन काळात सर्व धार्मिक कार्यक्रमाला बंदी होती शासन निर्णयानुसार त्याची अमलबजावणी विश्ववारकरी सेना च्या वतीने करण्यात आले लग्न कार्यक्रम जिवनाश्यक वस्तु विक्री दुकान; माल , दारु दुकानाला परवानगी देऊन पुर्वरत सुरु असुन मात्र भजन किर्तनाला […]

Archives

Categories

Meta