*वनमंत्री तथा पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसा निमित्त अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप कार्यक्रम संपन्न*

*”वनमंत्री तथा पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसा निमित्त अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप कार्यक्रम संपन्न*”

 घाटंजी : शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी अर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे सेवन प्रभावी ठरते. त्यामुळे पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घाटंजी तांड्याच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी तांड्याचे नायक श्री. नामदेवरावजी आडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कारभारी श्री.अरविंदभाऊ जाधव, वैद्यकीय तद्न्य डॉ.भारतभाऊ राठोड,डॉ.अक्षय मारोती राठोड, डॉ.आशिष राठोड, डॉ.विजय जाधव डॉ.देविदास राठोड डॉ.ज्ञानेश्वर प्रेमदास राठोड आदी मान्यवरांच्या हस्ते गोळ्यांचे वितरण करण्यात आले.
डॉ.भारत राठोड यांनी अर्सेनिक अल्बम या गोळ्या विषयी व रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याविषयी मार्गदर्शन केले.


रविवार दि.५.७.२०२० रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता संत सेवालाल महाराज मंदिर, प्रोफेसर कॉलनी घाटंजी, येथे सदर गोळया वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन संजय आडे यांनी केले तर आभार श्रीकांत राठोड यांनी मानले यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रवीणभाऊ शिंदे,मनोज ढगले, कैलास राठोड,निलेश चव्हाण, सीतारामजी राठोड,ब्रम्हानंदजी चव्हाण,मारोती राठोड, प्रेमदास राठोड, भागवत राठोड, बाबूसिंग राठोड,राजू राठोड,अनिल जाधव, रवी ना.आडे,विशाल जाधव,संदीप चव्हाण,रोशन जाधव,लकी चव्हाण, लखन राठोड आदी उपस्थित होते.सदर गोळ्या ठाणे -पालघर जिल्हा शिवसेना बंजारा समाज संघटक श्री सुधीरभाऊ राठोड यांच्या कडून पुरवण्यात आल्या. कार्यक्रम करते वेळी सोशल डिस्टनसिंग चे पालन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कृषीमंत्र्यांनी केले ऑक्सीजन पार्कचे कौतुक

Tue Jul 7 , 2020
कृषीमंत्र्यांनी केले ऑक्सीजन पार्कचे कौतुक यवतमाळ : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात वन विभाग अनेक प्रयोगशील उपक्रम राबवित आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तसेच शहरातील नागरिकांना निरोगी राहण्यासाठी स्वच्छ हवेची आवश्यकता ऑक्सीजन पार्कसारख्या उपक्रमातून मिळते. यवतमाळ शहरात वन विभागाने साकारलेल्या ऑक्सीजन पार्कचा आदर्श इतरही जिल्ह्यांनी घ्यावा, या शब्दात राज्याचे […]

Archives

Categories

Meta