मौदा नगरपंचायतच्या भोंगळ नियोजनामुळे सर्वेयरचा जीव भांडयात…

मौदा नगरपंचायतच्या भोंगळ नियोजनामुळे सर्वेयरचा जीव भांडयात…

मौदा पत्रकार संघाने केली मुख्याधिकारी कराळे यांच्यावर कारवाईची मागणी …

मौदा :  देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. .ग्रामीण भागातही जोर धरू लागला आहे, आतापर्यंत शुन्य असणाऱ्या मौदा शहरात दोन रुग्ण आढळून आले या काळात आपले जीव धोक्यात घालून कोरोना सर्व्हेकरणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व शिक्षक यांचा मात्र मौदा नगर पंचायतच्या गलथान कारभारामुळे जीव भांड्यात पडला आहे.  मुख्याधिकारी कोमल कराळे  यांची पत्रकारांबद्दल वर्तणूक चांगली नाही त्यामुळे यांच्यावर कारवाई  करा अशी मागणी मौदा तालुका पत्रकार संघाने उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

मौदा शहरात नुकतीच एक अंगणवाडी सेविका कोरोना संसर्गित आढळून आली, त्या सेविकेने आपल्याला असलेल्या हृदय आजार बाबत माहिती देऊन अवगत केले होते तरीही तिला सर्व्हे करण्यात लावण्यात आले होते सर्वे न केल्यास कारवाई करण्याची धमकी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्या कडून देण्यात आली होती अशी माहिती अन्य सेविकानी दिली .कोरोना सर्वे करणाऱ्यांनी  वारंवार तहसीलदार, मुख्याधिकारी यांना फेसशीलड, मास्क, सॅनिटाईजर व सुरक्षा साधनांची मागणी केली मात्र मुख्याधिकारी यांच्याकडून मागणीला नेहमी केराची टोपली दाखवली जाते. आम्ही आज आपल्या जीवावर उदार होऊन  हे कार्य करीत आहेत पण आमचा वाली कोण?  मुख्याधिकारी आमच्या समस्या ऐकून घ्यायला तयार नाहीत, यांच्या ढिसाळ नियोजन मूळे कुणाला २५ तर कुणाला १०० घरे आहेत, वेळेवर तोंडी आदेश दिले जातात असेही मौदा तहसीलदार यांना यावेळी सर्वेयरनी सांगितले.

मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करा : पत्रकार संघाचा जिल्हाधिकारी यांना निवेदन

पत्रकार  जीवाची परवा न करता बातमी घेण्याकरिता जात असतो, परंतु त्यांच्या सहकार्यांना माहिती विचारली असता “तुम्ही इथे कसे” “तुम्ही पत्रकार आम्हाला इथे दिसलेच नाही पाहिजे” अशी वर्तणूक करून मौदा तालुक्याचे पुण्यनगरीचे पत्रकार शैलेश रोशनखेडे यांचा अपमान करण्यात आला. मुख्याधिकारी यांच्या विरोधात अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक व अश्या बऱ्याच तक्रारी आहेत.  त्याचप्रमाणे शासनाच्या लोकउपयोगी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचा दृष्टीने माहिती देत नाही,  मुख्याधिकारी हे लोकांसोबत समन्वय साधण्यास अपयशी ठरत आहेत. नगरपंचायत मुख्याधिकारी कोमल कराळे यांच्या दुसऱ्या नगरपंचायतला बदली न करता योग्य समज देऊन कारवाई करण्यात यावी. असे निवेदन मौदा येथील उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी नागपूर यांना देण्यात आले.

निवेदन देते वेळी जिल्हाकार्याध्यक संतोष सेलोटे, जिल्हा सरचिटणीस शैलेश रोशनखेडे, तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम डोरले, उपाध्यक्ष कैलाश बनकर, कोषाध्यक्ष रघुनाथ सहारे, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोलामगुड्यांवरील आरोग्य व्यवस्था सुधारण्याची नितांत गरज : डाँ. श्रुती आष्टणकर

Thu Aug 6 , 2020
  कोलामगुड्यांवरील आरोग्य व्यवस्था सुधारण्याची नितांत गरज : डाँ. श्रुती आष्टणकर कोलाम विकास फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिबिर संपन्न चंद्रपूर: माणिकगड पहाडावरील आदिम कोलाम समुदायात आरोग्याबाबत असलेली अनास्था ही अत्यंत गंभीर बाब असून, कोलामांच्या आरोग्यासाठी राबविली जाणारी व्यवस्था तोकडी व नादुरूस्त असल्याचे दुर्दैवी चित्र जिवती तालुक्यात पहावयास मिळते. ही व्यवस्था यथाशिघ्र दुरुस्त […]

Archives

Categories

Meta